मुंबई- बॉलिवूडसाठी १८ जुलै ही तारीख फार खास असते. या दिवशी बॉलिवूडमधील दोन सुंदर अभिनेत्रींचा जन्म झाला. या अभिनेत्री आहेत आणि . प्रियांका यावर्षी तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तर भूमी तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. दोघींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या काही माहीत नसलेल्या गोष्टींचा उलगडा करू. प्रियांका चोप्रा - मुंबईमध्ये जोपर्यंत होती तोपर्यंत आपला प्रत्येक वाढदिवस तिने अनाथ मुलं आणि कर्करोगग्रस्त मुलांसोबत साजरा केला. ही तिची सर्वात आवडती गोष्ट होती. - करिअरमध्ये नेहमीच नाविण्याच्या शोधात राहिली. 'ऐतराज' सिनेमात नकारात्मक भूमिका करायला अनेकांनी नकार दिला होता. मात्र तिने ही भूमिका स्वीकारली. पण असं असलं तरी नकारात्मक भूमिका फक्त हीच तिची ओळख राहिली नाही. - दोनदा जगातील सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत प्रियांकाचं नाव आलं आहे. 'गॉड तुसी ग्रेट हो' सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यान तिच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. मात्र तरीही सिनेमाचं शूटिंग तिने न थांबता अधिक वेळ देऊन पूर्ण केलं होतं. - प्रियांकाचं अमेरिकेला जाण्यामागचं एक कारण तिचे ब्रेकअप असल्याचंही म्हटलं जातं. अनेक ब्रेकअपनंतर ती मनातून तुटली होती. ती मनाने फार हळवी आहे. 'गंगाजल' सिनेमाच्या चित्रीकरणातील एका फाइट सीनमध्ये चुकून तिचा पाय सहकलाकार मानव कौलच्या गळ्यावर लागला होता. या घटनेनंतर ती ढसाढसा रडली होती. - अनेक वादांनंतरही नावाजलेल्या दिग्दर्शकांसोबत काम केलं. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत तिचे काही वाद झाले होते. तरीही 'राम लीला' आणि 'मेरी कॉम'सारख्या सिनेमात काम केलं. यानंतर 'बाजीराव मस्तानी' सिनेमाही केला. भूमी पेडणेकर - वजन कमी करणं आणि वाढवण्यात भूमीने नेहमी आमिरच्या पावलांवर पाऊल ठेवलं आहे. दम लगा के हइशा सिनेमासाठी तिने २० किलो वजन वाढवलं तर डॉली, किट्टी और चमकते सितारे सिनेमासाठी १३ किलो वजन कमी केलं. - भूमी पक्क्या विचारांची आहे. असं असूनही आजही तिचे पाय जमिनीवर आहेत. लोकांना असं वाटतं की भूमीचं इंग्रजी कच्च आहे आणि ती गावातून मुंबईत आली आहे. पण असं नाहीये. भूमी पहिल्यापासूनच मुंबईत राहत आहे. - क्लायमेट वॉरिअर होऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा आहे. पर्यावरण संरक्षणाशी निगडीत अनेक प्रश्नांवर भूमी पुढाकर घेऊन बोलते. - सिनेसृष्टीत करिअर करायचं भूमीने आधीच ठरवलं होतं. कोणत्याही अपघाताने ती सिनेसृष्टीत आली नसून यासाठी तिने योग्य पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं. फार कमी वयात तिने सुभाष घई यांच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले. यानंतर तिने सहा वर्ष यशराज फिल्म्सची कास्टिंग हेड शानू शर्माची असिस्टन्ट म्हणून काम केलं. - सोनचिडीया सिनेमाच्या चित्रीकरणावेळी भूमीने भिंड-मुरैना परिसरात फार वेळ घालवला. एवढंच नाही तर सिनेमाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिथल्या गावकऱ्यांसाठी तिने शौचालयंही बांधली. अभ्युदय आश्रममध्ये राहणाऱ्या मुलींसाठी हॉस्टेलचं रिनोवेशनही केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eK0O6l