नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी खासगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपले दोन बंद केले आहेत. जिओचे ४९ रुपये आणि ६९ रुपयांचे दोन्ही प्लान कंपनीने बंद केले आहेत. हे दोन्ही प्लान जिओ फोन युजर्ससाठी होते. हे प्लान आता रिलायन्स जिओच्या वेबसाईटवरून हटवण्यात आले आहेत. त्यामुळे युजर्संना आता हे प्लान आता रिचार्ज करता येवू शकणार नाहीत. रिलायन्स जिओने या प्लानला Shorter Validity Plan (छोटी वैधतेचे प्लान) असे नाव दिले होते. म्हणजेच कमी किंमतीतील प्लान होते. वाचाः ४९ रुपये आणि ६९ रुपयांचे प्लान काय होते या दोन्ही प्लानची वैधता १४ दिवसांची होती. दोन्ही प्लानमध्ये वेगवेगळी सुविधा मिळत होती. या प्लानला ५ महिन्यांपूर्वी आणले होते. ४९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी २५० नॉन जिओ मिनिट्स आणि २५ एसएमएस मिळत होते. इंटरनेटसाठी ग्राहकांना या प्लानमध्ये २ जीबी डेटा दिला जात होता. वाचाः तर, ६९ रुपयांच्या प्लानमध्ये जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी २५० नॉन जिओ मिनिट्स आणि २५ एसएमएस दिले जात होते. इंटरनेट साठी ग्राहकांना रोज ०.५ जीबी डेटा दिला जात होता. तसेच या प्लानची वैधता १४ दिवसांची होती. त्यामुळे ग्राहकांना या प्लानमध्ये एकूण ७ जीबी डेटा दिला जात होता. दोन्ही प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात होते. वाचाः आता हे स्वस्त प्लान या दोन्ही प्लान्सला बंद केल्यानंतर जिओ फोन युजर्संसाठी आता ७५ रुपयांचा प्लान सर्वात स्वस्त प्लान आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. रोज ०.१ जीबी डेटा मिळतो. यामुळे युजर्संना एकूण ३ जीबी डेटाचा वापर केला जावू शकतो. यात जिओ ते जिओवर अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी ५०० नॉन जिओ मिनिट्स आणि ५० एसएमएस मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2COZ3YE