मुंबई: लॉकडाउनच्या काळात आलेल्या अवाच्या सव्वा वीज बिलामुळे फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर सेलिब्रिटींनाही 'शॉक' बसला आहे. अभिनेता याला देखील विजेच्या बिलाचा झटका लागल्यानं ट्विट करत त्यानं संताप व्यक्त केला आहे. वीज बिल पाहिल्यानंतर संतापलेल्या अर्शदनं ट्विटरवर '' या वीज कंपनीला टॅग करत राग व्यक्त केला होता. 'हायवे लुटारु 'अदानी'कडून आलेलं हे माझं वीज बिल. आपलं बिल पाहून अदानींना हसू येत आहे. १,०३,५६४ रुपये तुमच्या खात्यातून ५ जुलै २०२० रोजी डेबिट झाले' असं ट्वीट करत अर्शदनं अदानींवर निशाणा साधला. अर्शदनं हे ट्विट केल्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून त्याची तात्काळ दखल घेण्यात आली पण त्यांनं केलेल्या ट्विटवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया देखील दिली. 'या महिन्यात जास्त बील आल्यामुळं तुमची चिंता आम्ही समजू शकतो, आम्ही तुम्हाला मदत देखील करण्यास तयार आहोत. मात्र वैयक्तिक बदनामी करणारी टीका सहन केली जाणार नाही' अशा शब्दांत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदला प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीकडून अर्शदची समस्या सोडवण्यात आली. त्यामुळं त्यानं हे ट्विटस् डिलिट केले आहेत. 'अदानी इलेक्ट्रिसिटी'कडून समस्या सोडवण्यात आल्यानंतर अर्शदनं पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. 'अदानी इलेक्ट्रिसिटीकडून तात्काळ प्रतिसाद मिळाला, समस्या सुटली. आपल्याला फक्त त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे .... धन्यवाद' असं त्यानं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींनी भरमसाठ वीज बिलावरुन सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यांचं मे महिन्यातलं विजेचं बिल तब्बल १८ हजार ८० रुपये एवढं आलं आहे. याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी ट्विट करून, एका महिन्यात एवढं बिल कसं येऊ शकतं? असा प्रश्न संबंधित वीज कंपनीला केला होता. विद्युत बिलाचा असाच झटका अभिनेत्री तापसी पन्नूलादेखील बसला आहे. त्यांच्या घराचं वीजेचं बिल तब्बल ३६ हजार रुपये आलं आहे. तापसीनं याबद्दल ट्विट करत म्हटलं की, 'तीन महिन्यांपासून देशात लॉकडाउन आहे. या काळात घरातल्या कोणत्याच उपकरणाचा जास्त वापर करण्यात आला नाही. असं असतानाही ३६ हजार रुपये बिल कसं आलं? तुम्ही कशा प्रकारे बिल तयार करता?' अभिनेत्री कार्तिका नायरलाही जून महिन्यात जवळपास लाखभर रुपयांचं वीज बिल आलं आहे. तिनंही यावर, कोणता घोटाळा होत आहे का? असा प्रश्न ट्विटरवर विचारला. तापसीनं आणखी एक ट्विट करत म्हटलं की, 'या घरात कुणी राहत नाही तरी या घराचं बिल ८ हजार ६४० रुपये आलं आहे. हे घर आठवड्यातून एकदा फक्त साफसफाईसाठी उघडलं जातं.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gpyiby