Full Width(True/False)

ओप्पोचा Reno 3 Pro दोन हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः Oppo खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. फोनची किंमत कंपनीने २ हजार रुपयांनी स्वस्त केली आहे. आता या फोनची किंमत ३१ हजार ९९० रुपयांवरून २९ हजार ९९० रुपये झाली आहे. लाँच करण्यात आले त्यावेळी या फोनची किंमत २९ हजार ९९० रुपये होती. परंतु, जीएसटीत वाढ झाल्यानंतर कंपनीने या फोनची किंमत वाढवली होती. ती ३१ हजार ९९० रुपये झाली होती. परंतु, आता डिस्काउंटनंतर या फोनची किंमत पुन्हा एकदा कमी झाली आहे. वाचाः ला मिळालेल्या या प्राईस कटची माहीती मुंबईच्या रिटेलर महेश टेलिकॉमने दिली आहे. या माहितीनुसार, या फोनची नवीन किंमत आजपासून लागू होणार आहे. फोनची नवीन किंमत आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावर सुद्धा रिफ्लेक्ट झाली आहे. वाचाः रेनो ३ प्रोचे वैशिष्ट्ये फोनमध्ये ८ जीबी आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत मीडियाटेक हीलियो P95 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड ColorOS 7 काम करतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4025mAh बॅटरी दिली आहे. फोन लवकरच चार्ज व्हावा यासाठी यात 30 वॉट का VOOC चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी Super AMOLED डिस्प्ले दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ४४ मेगापिक्सल सोबत एक ३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा तसेच क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक १३ मेगापिक्सलचा, एक ८ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YQuAlh