मुंबई: अभिनेत्री हिच्या '' या वेब सीरिजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेब सीरिजचं प्रक्षेपण थांबवावं असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. स्वराला प्रचंड ट्रोल देखील करण्यात येत आहे. 'रसभरी'वर केवळ प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी टीका केली नाही तर अनेक कलाकार मंडळी देखील या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या अनेक गोष्टींवर आक्षेप घेत आहेत. लेखक, कवी, गीतकार प्रसून जोशी यांनी या सीरिजसंदर्भात एक ट्विट केलं आहे. ही सीरिज बघून वाईट वाटलं. काही मद्यपान करणाऱ्या पुरुषांसमोर एक लहान मुलगी उत्तेजक डान्स करताना दिसतेय. हे कितपय योग्य आहे? निर्माता आणि प्रेक्षकांनी देखील याचा विचार करायला हवा. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं की लहान मुलींकडे बघण्याचा दृष्टीकोन? मनोरंजनासाठी लहान मुलांचा वापर होत असेल तो थांबवायला हवं', असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. प्रसून जोशी यांच्या या ट्विटवर स्वरानं रिप्लाय दिला आहे.'सर तुम्ही या दृश्यांना चुकीचं समजत आहात. यात जे दाखण्यात आलंय ते याच्या विरुद्ध आहे. ती मुलगी तिच्या मर्जीनं डान्स करतेय. पण बघणारे मात्र उत्तेजक नजरेतून पाहत आहे. या दृश्यात हेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dAspGN