Full Width(True/False)

लावा Z61 Pro वि. शाओमी Redmi Go: कोणता फोन बेस्ट?

नवी दिल्लीः लावाने देशात एंट्री-लेवल स्मार्टफोन लाँच केला आहे. या हँडसेटची किंमत ५ हजार ७७४ रुपये आहे. यात १.६ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोन मिडनाईट ब्लू आणि अंबर रेड कलरमध्ये उपलब्ध आहे. Lava Z61 Pro मध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. लावाचा हा हँडसेट बाजारात आधीच उपलब्ध असलेला एंट्री-लेवल स्मार्टफोनला टक्कर देणार आहे. शाओमीच्या या फोनची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. वाचाः डिस्प्ले लावाच्या Lava Z61 Pro मध्ये ५.४५ इंचाचा एचडीप्लस फुल व्ह्यू डिस्प्ले दिला आहे. तर शाओमीच्या रेडमी गोमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1280x720 पिक्सल आहे. वाचाः रॅम, स्टोरेज, प्रोसेसर लावाच्या फोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. तर शाओमीच्या रेडमी गोमध्ये १ जीबी रॅम आणि ८ जीबी व १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. लावाच्या फोनमध्ये १.६ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे तर रेडमी गोमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर दिला आहे. शाओमीच्या फोनमध्ये अँड्रॉयड ओरियो ८.१ दिला आहे. वाचाः कॅमेरा लावाच्या फोनमध्ये ८ मेगापिक्सल रियर तर ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तर शाओमीच्या रेडमी गो मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. बॅटरी लावाच्या स्मार्टफोनमध्ये 3100mAh बॅटरी दिली आहे. तर शाओमीच्या फोनमध्ये 3000mAh च्या क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः किंमत आणि कलर व्हेरियंट Lava Z61 Pro ची किंमत ५,७७४ रुपये आहे. हा फोन मिडनाईट ब्लू व अंबर रेड कलरमध्ये मिळतो. तर रेडमी गो स्मार्टफोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहे. १ जीबी रॅम व ८ जीबी स्टोरेच्या फोनची किंमत ४४९९ रुपये तर १ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६ हजार ७०० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fmCys8