मुंबईः अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या यांची स्टँडअप शोमध्ये थट्टा केल्याप्रकरणी कॉमेडीयन अग्रिमा जोशुआचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. तसंच अनेक राजकीय मंडळींनी कारवाईची मागणी केल्यानंतर अखेरच अग्रिमा जोशुआनं ट्विटद्वारे माफी मागितली आहे. एका शोदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या थट्टेमुळं शिवप्रेमी आणि नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली होती. अनेक राजकीय पक्षांनीही तिच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओची तोडफोड केली आहे. अग्रिमा जोशुआनं शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं समस्त शिवप्रेमींच्या व महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. मनसे कार्यकर्त्यांनी जोशुआ काम करत असलेल्या स्टुडिओत जाऊन तोडफोड केली आहे. मनसेचे कार्यकर्ते यन रानडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. मनसेनं दणका दिल्यानंतर अग्रिमा जोशुआनं लेखी माफिनामा सादर केला आहे. जोशुआनं तिच्या ट्विटर अकाउंटवरुनही जाहीर माफी मागितली आहे. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे. हिनं ट्विटकरत तमाम शिवभक्तांची माफी मागितली आहे. ' थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भक्तांची मनं दुखावल्यानं मी त्यांची मनापासून माफी मागते. तसंच तो व्हिडिओही हटवण्यात आला आहे.'असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, काल १० जुलै रोजी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेते यांनी अग्रिमा जेशुआला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अग्रिमा जेशुआला तात्काळ अटक करण्याची मागणी केली होतं.शिवरायांच्या पुतळ्याचं विडंबन करून कॉमेडी सादर केली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला शिवाजी महाराजांबद्दल आदर नाहीये किंवा माहिती नाहीये हे लक्षात येतं. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल तर ते आयोग्य आहे. यासाठी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहून जोशुआला अटक करण्याची मागणी केली आहे. असं प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं होतं. पैसे कमावण्यासाठी जर महाराजांचा वापर करत असशील तर महिला आघाडी व युवासेना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. यासारखे वक्तव्य महाराष्ट्रातील जनता व शिवभक्त खपवून घेतले जाणार नाहीत, असा ईशारा आमदार सरनाईक यांनी दिला होता. शोमध्ये काय म्हणाली अग्रिमा जोशुआ? 'शिवाजी पुतळ्यासंदर्भात मी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी इंटरनेटवर सर्च केलं. मला एक कोणीतरी लिहिलेला भलामोठा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे... यामुळं महाराष्ट्रात त्यांची सत्ता येईल... तर दुसऱ्या एकाला वाटलं क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, त्यानं लिहिलं की, यात जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार शिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसऱ्या एका व्यक्तीनं शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं... बस्स मी त्यालाच फॉलो केलं', असं तिनं तिच्या शोमध्ये म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DzMD7n