Full Width(True/False)

आता रस्त्याला नाव दिलं सुशांतसिंह राजपूत चौक

पटणा- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाचा देशभरातील चाहत्यांना धक्का बसला. लोक आपआपल्या परिने त्याला श्रद्धांजली देत आहेत. नुकतंच त्याचं मूळ घर येथील एका रस्त्याला असं नाव देण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, महापौर सरिता देवी म्हणाल्या की, 'सुशांत एक उत्तम कलाकार होता आणि त्याच्या नावा रस्त्याचं नाव ठेवणं हे त्याला एकप्रकारची श्रद्धांजली वाहण्यासारखं आहे. मधुबनीहून माता चौकला जाणाऱ्या रस्त्याला सुशांतचं नाव देण्यात आलं आहे. एवढंच नाही तर प्रसिद्ध कार कंपनीच्या गोल चक्करचं नाव बदलून आता सुशांतसिंह राजपूत चौक करण्यात आलं आहे.' पंतप्रधानांना पत्र लिहून सीबीआय चौकशीची केली मागणी याशिवाय सरिता यांनी सांगितलं की त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सुशांतच्या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रसिद्ध अभिनेता शेखर सुमनने बिहारचे मुख्यमंत्र्यांची यासंबंधी भेट घेतली होती. सुशांतचे चाहतेही सरकारकडे वारंवार उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. सुशांतच्या नावाने सुरू होणार फाउंडेशन सुशांतच्या कुटुंबियांनी त्याच्या नावाने 'सुशांतसिंह राजपूत फाउंडेशन' सुरू करण्याचा निर्णय घेतला. या फाउंडेशनमधून ते सुशांतल्या आवडणाऱ्या गोष्टी सायन्स, स्पोर्टस्, सिनेमा यांसारख्या गोष्टींशी जोडल्या गेलेल्या तरुण पिढीला मदत करतील. सुशांतचं लहानपणीचं घर होणार संग्रहालय एवढंच नाही तर राजीव नगर येथील सुशांतचं लहानपणीच्या घराचं संग्रहालयात रुपांतर करण्यात येणार आहे. इथे त्याच्या चाहत्यांसाठी सुशांतच्या खासगी गोष्टी पाहण्यासाठी ठेवण्यात येतील. यात हजारो पुस्तकं, त्याचा टेलिस्कोप, फ्लाइट सिम्युलेटर अशा गोष्टी असतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/325vNr5