मुंबई: अभिनेता यांच्या आत्महत्येनंतर सोशल मीडिवर अनेक मेसेज व्हायरल झाले आहेत. सुशांतची आत्महत्या नसून मर्डर करण्यात आल्याचंही म्हटलं जात आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये अभिनेता याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुरजवर वारंवार आरोप होत असल्यानं एक इन्स्टाग्राम पोस्ट करत त्यानं दिशा किंवा सुशांतच्या आत्महत्येशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सुरज पांचोली काही मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसतोय. यात त्याच्यासोबत एक मुलगी दिसतेय,ती दिशा असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या फोटोसोबत दिली जाणारी माहिती साफ खोटी असल्याचं सुरजनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची एक्स मॅनेजर हिनं आत्महत्या केली होती. त्यावरून या दोघांच्या मृत्यूचा संबंध सुरज पांचोलीसोबत जोडण्यात येत आहे. इतकंच नव्हे तर एका पोस्टमध्ये सुरज आणि दिशा यांचं प्रेमप्रकरण फक्त सुशांतला माहित होतं. सुरजमुळं दिशा गरोदर राहिली होती. पण सुरजनं ब्रेकअप केलं. त्यामुळं सुशांत आणि सुरजमध्ये वादावादी झाली होती. इतकंच नव्हे तर दिशाची आत्महत्या नसून सुरजनं तिला धक्का दिल्यानं ती खाली पडली असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे सत्य सुशांतला माहित होतं. तो हे सत्य सर्वांना सांगणार होता. त्यापूर्वी सुरज पांचोली, सलमान खान आणि महेश भट्ट यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीनं सुशांतचा मर्डर घडवून आणला', असं म्हटलं गेलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळं सुरज संतापला असून त्यांनं व्हायरल होणाऱ्या फोटोमागंच सत्य सांगितलं आहे. फोटोमध्ये माझ्यासोबत मुलगी आहे ती दिशा नसून माझी दुसरी मैत्रिण आहे, ती तर भारतात देखील राहत नाही. हा फोटो २०१६मधला असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्याच दिशाला एकदाही भेटलो नाही, असं सुरजनं म्हटलं आहे. 'सुशांत आत्महत्या प्रकरणात मला कारण नसताना ओढलं जात आहे मी सुशांतला देखील जेमतेम २-३ वेळा भेटलो आहे. असंही सुरज म्हणाला. या सर्व प्रकारावर सुरज पांचोलीचे वडिल आदित्य पांचोली यांनी प्रतिक्रिया दिली होती' आजकाल सोशल मीडियावर कोणीही काहीही लिहित आहे.असं केल्यानं एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर किती परिणाम होत असेल याची त्यांना कल्पनाही नसते. या गोष्टींमुळं सुरजला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून तो हे सगळं सहन करत आहे. त्याला रेपिस्ट आणि हत्यारा म्हणून हिनवलं जातंय. आता दिशा आणि सुशांत प्रकरणात त्याला विनाकारण ओढलं जात आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु त्यांना सुरजवर करण्यात आलेल्या या खोट्या आरोपांचीही माहिती असायला हवी, सुशांतच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी तर व्हायलाच हवी... जे सत्य आहे ते सर्वांसमोर आलंच पाहिजे',असं आदित्य पांचोली यांनी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ientds