Full Width(True/False)

रिया चक्रवर्ती खरंच गायब झाली का? वकिलांनी केला खुलासा

मुंबई: दिवंगत अभिनेता याच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांसोबत आता बिहार पोलीसही चौकशी करत आहेत. सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटणातील राजीव नगर पोलीस ठाण्यात आणि तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यानंतर बिहार पोलीस सर्वातआधी रियाच्या घरी तिची चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना रिया भेटली नाही. आता असं म्हटलं जात आहे की तीन- चार दिवसांपूर्वी रियाचं कुटुंबही मध्यरात्री मुंबईचा फ्लॅट सोडून दुसऱ्या ठिकाणी गेली. बिहार पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी रिया पळ काढत आहे. रिया नक्की कुठं आहे हे सध्या तरी बिहार पोलिसांना माहिती नाहीए. त्यामुळं रिया गायब किंवा बेपत्ता झाल्याच्या अफवा पसरली आहे. यावर तिचे वकील यांनी खुलासा केला आहे. रिया कुठंही गायब झाली नाही. ती पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला रियाच्या इमारतीच्या सेक्रेटरीने मुलाखत दिली. यात त्यांनी रियासह रियाचे आई- वडील आणि भाऊ यांनी मुंबईतलं राहतं घर सोडलं आणि निळ्या रंगाच्या गाडीतून ते निघून गेले. त्यांनी हेही सांगितलं की सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्याने या घरी येणं- जाणं बंद केलं होतं. बिहार पोलिसांपासून का पळत आहे रिया या प्रकरणात मुंबई पोलिसांप्रमाणे बिहार पोलीसही रियाची चौकशी करणार आहे. दरम्यान, रियाने सोशल मीडियावर तिची प्रतिक्रिया देणारा एक व्हिडिओ शेअर केला होता. यात न्यायव्यवस्थेवर तिला पूर्ण विश्वास असून तिला न्याय नक्की मिळेल असं तिने यात म्हटलं होतं. यासोबतच सुरुवातीला रियाला मुंबई पोलिसांच्या तपासणीवर विश्वास नव्हता. आता ती बिहार पोलिसांपासूनही पळत आहे. यावरूनच तिच्या वागण्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30mj2H9