Full Width(True/False)

एक कॉल आणि मुंबई पोलिसांची फाइल झाली डिलीट!

मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पहिल्या दिवसापासून प्रश्न उपस्थित केले जात आहे. पहिल्या दिवसापासून या केसची तपासणी करत आहेत. मात्र सुशांतचे वडील केके सिंह यांनी रिया चक्रवर्तीसह अजून चारजणांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या घटनेला वेगळं वळण मिळालं. आता बिहार पोलिसही या प्रकरणी चौकशी करत आहे. मात्र जेव्हापासून बिहारची टीम मुंबईत आली तेव्हापासून मुंबई पोलीस त्यांना आवश्यक ते सहकार्य करत नसल्याचं सातत्याने म्हटलं जात आहे. डिलीट झाली दिशा सालियनची फाइल? एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या अँगलने सुशांतच्या मृत्यूची चौकशी करत आहे. याचसंबंधी पटणा पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे दिशा सालियनची फाइल मागितली. असं म्हटलं जातं की, मुंबई पोलीस या संबंधीची फाइल बिहार पोलिसांना देणार होते. मात्र त्यांना एक अज्ञात फोन आला आणि त्यांनी दिशाच्या केस फाइलचा फोल्डर डिलीट झाल्याचं उत्तर दिलं. लॅपटॉप देण्यासही नकार या रिपोर्टमध्ये असेही म्हटलं आहे की, बिहार टीमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लॅपटॉपमधून डिलीट झालेली फाइल परत मिळवता येऊ शकते. पण त्यासाठी लॅपटॉप देण्यासही मुंबई पोलिसांनी नकार दिला. यासोबत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी बिहार पोलिसांच्या टीमला या केसपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. घरातच नव्हतं दिशाचं कुटुंबिय आणि चावीवाल्याचा शोध या रिपोर्टमध्ये लिहिलं की, बिहार पोलिसांची टीम दिशा सालियनच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी तिच्या घरी गेली होती. मात्र तिचं कुटुंब घरी नव्हतं. आता बिहार पोलिसांना त्या चावीवाल्याचा शोध आहे ज्याने सुशांतच्या खोलीचा दरवाजा उघडला होता. एक दिवसआधीच पोलिसांनी दिग्दर्शक रूमी जाफरी यांची चौकशी केली होती. ते लवकरच सुशांत आणि रियासोबत एक सिनेमा करणार होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EJw619