नवी दिल्लीः शाओमी ने चे नवीन स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कंपनीने याआधी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या फोनचे टीझर रिलीज केले होते. शाओमीने Redmi Note 8 Pro स्मार्टफोनच्या लाँचिंगनंतर जवळपास एक वर्षानंतर याचे नवीन कलर आणले आहेत. हा चा नवीन कलर ऑरेंज कलर व्हेरियंट आहे. शाओमीचा ऑरेंज कलर व्हेरियंटच्या काही रेंडर इमेज सुद्धा शेयर केले आहेत. वाचाः भारतात कधी येणार नवीन व्हेरियंट नवीन कलर व्हेरियंट सोबत शाओमीचा Redmi Note 8 Pro आता ५ वेगवेगळ्या कलरमध्ये आला आहे. रेडमी नोट ८ प्रो चा नवीन कलर भारतात कधी लाँच होणार या संबंधी कंपनीने अद्याप काही स्पष्ट केले नाही. आता इंडियन ग्राहकांना शाओमीचा हा फोन गामा ग्रीन, इलेक्ट्रिक ब्लू, हॅलो व्हॉईट आणि शॅडो ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येवू शकतो. रेडमी नोट ८ प्रोचा कोरल ऑरेंज कलर व्हेरियंटची किंमत आधी इतकीच असू शकते. वाचाः Redmi Note 8 Pro गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये भारतात १४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. ही किंमत ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची होती. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये होती. परंतु, या वर्षीच्या सुरुवातीला जीएसटी वाढनंतर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ९९९ रुपये करण्यात आली आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये झाली आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा रेडमी नोट ८ प्रो स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1,080x2,340 पिक्सल आहे. शाओमीच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G90T प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. फोनच्या रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहे. फोनच्या बॅकला मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. तसेच मागे ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा अल्ट्रा मायक्रो लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. वाचाः फोन मध्ये 4,500 mAh बॅटरी सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. शाओमीच्या या फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज वाढवता येवू शकते. फोनमध्ये 4,500 mAh बॅटरी तसेच १८ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3itcP2r