मुंबई- सुशांतसिंग राजपूत प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री विरुद्ध तपासाचा वेग वाढविला आहे. यापूर्वी ईडीने रियाला पाच वर्षांचे रिटर्न दाखवायला सांगितले होते. आता त्यात ईडीला अनेक गोष्टींमध्ये त्रुटी असल्याचं दिसलं. याच गोष्टींचा आता तपास करणार आहे. टाइम्स नाऊकडे रियाचे २०१७-१८ आणि २०१८-१९ चे इनकम टॅक्स रिटर्नच्या फाइल आहेत. इनकम टॅक्स रिटर्ननुसार, २०१७-१८ मध्ये रियाचं वार्षिक उत्पन्न १८.७५ लाख आणि २०१८-१९ मध्ये १८.२३ लाख एवढं वार्षिक उत्पन्न होतं. पण ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, रियाने नुकतेच दोन आलीशान घरं विकत घेतली आहेत. ईडी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाच्या मालकीच्या दोन मालमत्तेच्या शोधात आहे. खार पूर्वेकडे असलेला फ्लॅट रियाच्या नावावर आहे. या घराची माहिती देताना रियाने ६० लाखांचे गृहकर्ज घेतल्याचे सांगितले. तर २५ लाख रुपये मिळकतीतून दिल्याचे स्पष्ट केले. मात्र इनकम टॅक्स रिटर्नच्या डिटेलमध्ये रियाने दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा गुंतवणूक मूल्य जास्त असल्याचे दिसले. काल सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची मुंबईच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात चौकशी सुरू होती. या तिघांसह ईडी श्रुती मोदीचीही चौकशी करत आहेत. शुक्रवारी सुमारे आठ तासांहून अधिक काळ रियाची चौकशी करण्यात आली होती. सोमवारीही तिची जवळपास १०.३० तास चौकशी सुरू होती. ईडीला रियाकडून तिचं उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूकी संबंधीची सर्व उत्तरं हवी आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, रियाने 14 लाख रुपयांचा आयटीआर दाखल केला आहे, पण तिची गुंतवणूक त्याहून जास्त आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gNdZp8