Full Width(True/False)

निशिकांत हा 'त्या' मोजक्या दिग्दर्शकांपैकी होता; राज ठाकरे भावूक

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्या निधनामुळं बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूड सोबतच इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी निशिकांतच्या अकाली निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. मनसेचे अध्यक्ष यांनीही जुन्या आठणवींना उजाळा देत निशिकांत कामत यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सिनेमाच्या कलेची उत्तम जाण असलेले राज ठाकरे यांचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्र आहेत. बॉलिवूडमधील कलाकारांशी त्यांच्या भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असतात. निशिकांत कामत हे राज यांच्या त्याच वर्तुळातील होते. त्यामुळं राज यांनी सविस्तर पोस्ट लिहून आपल्या मित्राला श्रद्धांजली वाहिली आहे. वाचा: आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणतात, 'निशिकांत कामतच्या निधनाने आपण एक उमदा दिग्दर्शक गमावला. त्याचं सिनेमावर मनापासून प्रेम होतं. दृश्य स्वरूपात सांगायची गोष्ट म्हणजे सिनेमा... हे मराठीतील ज्या अगदी बोटावर मोजता येतील इतक्या दिग्दर्शकांना कळलं होतं आणि ज्यांना स्वत:ची गोष्ट ताकदीनं मांडता यायची त्यात निशिकांत होता. वाचा: प्रत्येक दशकाचा एक 'कल्ट' सिनेमा असतो, तसा 'डोंबिवली फास्ट' हा मागच्या दशकातील मराठीतील कल्ट सिनेमा होता. राजकीय-सामाजिक स्थित्यंतरांमध्ये सामान्य माणूस घुसमटत असतो, त्यातून त्याचा स्वत:शीच संघर्ष सुरू होतो, ह्याचं भान निशिकांतमधल्या दिग्दर्शकाला होतं. सामान्य माणसाच्या आक्रोशाचा मराठीतील 'डोंबिवली फास्ट'मधून सुरू झालेला प्रवास हिंदीतल्या 'मुंबई मेरी जान'मध्येही सुरू राहिला. मराठी सोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही ज्या मोजक्या दिग्दर्शकांकडे दीर्घ टप्पा गाठायची क्षमता होती त्यात निशिकांत होता. त्यांच्या जाण्यानं मी एक चांगला मित्र आणि सिनेमावर भरभरून बोलणारा एक रसिग देखील गमावला,' अशी भावना राज यांनी व्यक्त केली आहे. निशिकांत कामत यांचं सोमवारी हैदराबादमधील रुग्णालयात निधन झालं. कावीळ आणि पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना मागच्या महिन्यात हैदराबादमधील गचीबोवली स्थित एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होता. त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज असल्याचं निदान झालं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2E8Fs6e