Full Width(True/False)

48MP कॅमेऱ्याचा Poco M2 Pro स्मार्टफोनचा आज सेल

नवी दिल्लीः भारतीय ग्राहकांना आज दुपारी १२ वाजता पोकोचा खरेदी करण्याची संधी आहे. या फोनचा ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. आज दुपारी १२ वाजता या सेलला सुरुवात होणार आहे. या फोनला जुलै मध्ये लाँच करण्यात आले होते. या मिड रेंज स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर, चार रियर कॅमेरे मिळतात. यात मोठी बॅटरीसोबत फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. वाचाः पोको एम२ प्रोची किंमत या स्मार्टफोनला तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनच्या 4GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये, 6GB + 64GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि 6GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. पोकोच्या या डिव्हाईसला तीन ग्रेडिएंट कलर्समध्ये लाँच करण्यात आले आहे. ग्राहक ब्लू, ग्रीन अँड ग्रीनर आणि ब्लॅक कलरच्या दोन शेड्सचे कलर व्हेरियंट्समध्ये आपला डिव्हाईस निवडू शकतो. चे फीचर्स जवळपास रेडमी नोट ९ प्रो या स्मार्टफोनशी मिळते जुळते आहेत. तसेच हा फोन रेडमी डिव्हाईसचा व्हेरियंट वाटतो. दोन्ही बाजुला चार्जिंग स्पीड सुद्धा आहे Poco M2 Pro मध्ये 33W चे फास्ट वायर्ड चार्जिंग सिस्टम देण्यात आले आहे. वाचाः Poco M2 Pro चे वैशिष्ट्ये पोकोच्या या डिव्हाईसमध्ये Redmi Note 9 Pro प्रमाणे 6.67 इंचाचा IPS LCD फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. चारही बाजुला बेजल्स देण्यात आले आहेत. सेल्फी कॅमेऱ्यासाठी यात पंच होल कॅमेरा कटआऊट देण्यात आला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा युजर्संना मिळणार आहे. तसेच ऑथेंटिकेशन साठी यात साईड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर सोबत येतो. वाचाः रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. मॉड्यूलमध्ये ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि चौथा डेप्थ सेन्सर दिला आहे. ६ जीबी रॅमपर्यंत आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज असणाऱ्या या फोनमध्ये Android 10 बेस़्ड MIUI 11 आणि त्यावर Poco Launcher 2.0 मिळतो. फोनला पॉवर देण्यासाठी 5020mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सिस्टम देण्यात आली आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g6bTj3