चैन्नई- ज्येष्ठ गायक बालसुब्रमण्यम यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचारही सुरू झाले आहेत. दरम्यान त्यांनी इस्पितळातून व्हिडिओ शेअर करून त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं. तसेच सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही सांगितलं. इस्पितळात आहेत बालसुब्रमण्यम व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, 'गेल्या दोन- तीन दिवसांपासून माझी प्रकृती थोडी बिघडल्यासारखी वाटत होती. छातीत दुखणं आणि सर्दी होता. तसंच ताप येत- जात होता. याशिवाय कोणताही त्रास नव्हता. पण मला या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं म्हणून मी करोनाची टेस्ट केली. यानंतर डॉक्टरांनी मला करोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यांनी मला औषधं दिली आणि सांगितलं की मी घरीच राहू शकतो. त्यांनी १५ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टीन होण्यास सांगितलं होतं. पण कुटुंबातील इतर सदस्यांचं आयुष्य मी धोक्यात घालू शकत नाही. याचमुळे मी इस्पितळात भरती होण्याचा निर्णय घेतला. इथे माझी चांगली काळजी घेतली जात आहे.' चाहत्यांनी कृपया फोन करू नये- यांनी आपल्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना आग्रह केला की त्यांना सतत फोन करून किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करून त्रास देऊ नये. 'मला फक्त सर्दी- खोकला आहे. पण अनेकजण मला फोन करत आहे. पण मी साऱ्यांचे फोन उचलू शकत नाही. मी लवकर बरा होईन. कृपया कोणी फोन करू नका.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33uEz2u