Full Width(True/False)

इशान खट्टर आणि तब्बूच्या बोल्ड सीनची जोरदार चर्चा

मुंबई टाइम्स टीम मीरा नायर यांच्या वेब सीरीजमध्ये मान कपूरची भूमिका निभावणारा अभिनेता सध्या चांगलाच चर्चेत आहे. लेखक विक्रम सेठची कादंबरी ''वर ही सीरिज आधारित आहे. यात तो सईदा बाई, म्हणजेच अभिनेत्री तब्बूसोबत बोल्ड सीन करताना दिसतोय. या सीनवरुन सध्या खूप चर्चा होतेय. याबद्दल तो पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. सीरिजमध्ये इशान खट्टर एका नेत्याच्या मुलाची भूमिका साकारत आहे. इशाननं सांगितलं की, 'हे आजच्या काळातील एक नातं आहे. कथेत एक बोल्ड सीन आहे. मी साकारत असलेली व्यक्तिरेखा थोडी विचित्र आहे. तो जवळपास त्याच्यापेक्षा वयाने दुप्पट असणाऱ्या महिलेच्या प्रेमात आहे. पण हे एक फार सुंदर नातं आहे. ही मान कपूरची भूमिका माझ्या करिअरसाठी महत्वाची आहे. शूटिंग सुरू होण्याआधी मी भूमिका व्यवस्थित समजून घेण्यासाठी कादंबरी पूर्ण वाचून काढली होती.' दरम्यान, मीरा नायर यांनी च्या भूमिकेबाबत सांगितले की, 'तब्बूऐवजी दुसरी कुणी अभिनेत्री असती, तर ही भूमिका जिवंत झाली नसती. तब्बूमुळे या भूमिकेत जीव आलाय.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33tJ3WY