Full Width(True/False)

थायलंड ट्रिपसाठी सुशांतनं खर्च केले तब्बल ७० लाख;रियानं केला त्याच्या लाइफस्टाइलचा खुलासा

मुंबई: दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिहं राजपूत याच्या मृत्यू प्रकरणा सुरुवातीपासूनच त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. सुशांतच्या पैशांवर डोळा ठेवून रियानं त्याचा वापर केला असं म्हटलं जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गप्प असलेली रिया आत व्यक्त होताना दिसत आहे. तिनं एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सुशांतचा मृत्यू झाल्यानंतर युरोप ट्रिप हा चर्चेचा विषय ठरत आहे. सुशांत रिया आणि रियाचा भाऊ शौविक हे तिघं मिळून युरोप ट्रिपला गेले होते. या ट्रिपनंतरच सुशांतची तब्येत बिघडली आणि त्याचं आयुष्य बदलून गेलं असं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर या ट्रिपचा सर्व खर्च सुशांतनं केला होता. तब्बल ४५ लाखांचा खर्च सुशांतनं केला असं म्हटलं जातं. परंतु रियानं या आरोपांवर तिचं स्पष्टीकरण दिलं आहे. सुशांतनं त्याच्या मर्जीनं हा खर्च केला होता. मी त्याला खर्च कर असं कधीही सांगितलं नव्हतं, असं रियानं म्हटलं आहे. इतकंच नाही तर सुशांत त्याच्या मित्रांसोबत एकदा थायलंड ट्रिपवर गेला होता. त्या ट्रिपसाठी सुशांतनं तब्बल ७० लाख खर्च केले होते. त्यानं या ट्रिपसाठी खास चार्टर प्लेन बूक केलं होतं.असं रियानं सांगितलं.मी सुशांतसिंह राजपूत याच्या पैशांवर जगले नाही, मी फक्त त्याचावर खरं प्रेम केलं होतं आणि हिच माझी चूक होती, अशी भावुक प्रतिक्रिया रियानं मुलाखती दरम्यान दिली आङे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lysn7A