Full Width(True/False)

जॅकलिननं घेतली महाराष्ट्रातील 'ही' दोन गावं दत्तक; कुपोषित बालकांना करणार मदत

मुंबई :लॉकडाउनच्या कठीण काळात बॉलिवूडचे अनेक कलाकार गरजूंच्या मदतीसाठी धावून आले. अभिनेत्री हिनं महाराष्ट्रातील दोन गावं दत्तक घेतली आहेत. पथराडी आणि सकूर अशी या गावांची नावं असून, ती जिल्ह्यातील आहे. या गावांतील कुपोषितांना सकस आहार मिळवा यासाठी जॅकलिन आणि तिची टीम प्रयत्न करणार आहे. जॅकलिननं नुकत्याच झालेल्या तिच्या वाढदिवशी ही गावं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. जॅकलिनने दत्तक घेतलेल्या गावांमध्ये 'पालघर न्यूट्रीशन प्रोजेक्ट' नावाचा उपक्रम राबवला जाणार आहे. तीन वर्षांचा हा प्रोजेक्ट असून, या अंतर्गत दीड हजार नागरिकांची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तेथील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातील. जेणेकरुन कुपोषितांचा नेमका आकडा कळेल. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची टीम नेमण्यात आली असून, तेथील महिलांना मुलांचं संगोपन आणि पौष्टिक आहाराबाबत मार्गदर्शन केलं जाईल. सुरुवातीला २० कुटुंबांच्या आरोग्याची तपासणी, पाठपुरावा केला जाईल. त्या कुटुंबातील कुपोषितांचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. जॅकलिन या प्रोजेक्टबद्दल सांगते की, 'गाव दत्तक घेण्याचा विचार कित्येक दिवसांपासून मनात होता. सध्या आपण सगळेच कठीण काळाचा सामना करत आहोत. अशा काळात काही लोक जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यांची मदत करण्यासाठी पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. स्वत:चा विकास करताना समाजाच्या उन्नतीसाठीदेखील नक्कीच काम केलं पाहिजे, असं मला पालकांनी लहानपणापासून शिकवलं आहे. त्यानुसार हे काम मी पूर्णत्वास नेणार आहे. माझ्या या निर्णयाला पालकांनी पाठिंबा दर्शवला आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hdJMjq