मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गुढ अकल्पनीय आहे. हे गुढ सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अलीकडेच सुशांतच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यात पोलीस आणि रुग्णवाहिकेचे कर्मचारी सुशांतचा मृतदेह घरातून बाहेर नेताना दिसत असताना एक अज्ञात महिला अपार्टमेन्टमध्ये शिरताना दिसली. त्याच्या घरात ती महिला आत शिरताना दिसताना दिसते. पण तिथे उपस्थित इतरांना मात्र दूर हटवण्यात येतं. एका अज्ञात व्यक्तीला भेटली ती महिला या व्हिडिओवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपार्टमेन्टमध्ये शिरल्यानंतर ती दुसर्या माणसाला भेटली आणि त्या दोघांमध्ये थोडा संवाद झाला. त्या अज्ञात व्यक्तीने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. महिलेशी बोलून झाल्यावर ती काळ्या पिशवीत काहीतरी ठेवते. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या दोन गूढ व्यक्तींची पोलिसांनी चौकशी का केली नाही असा प्रश्नही त्यांना विचारला जात आहे. स्वामींनी उपस्थित केले प्रश्न या विषयावर बोलताना भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टाइम्स नाऊला सांगितलं की, या सर्व गोष्टी करतील हे त्यांना आधीपासून माहीत होते. आता परिस्थिती पूर्णपणे बिघडली आहे. यापूर्वी स्वामींनी सुशांतच्या घरी दोन रुग्णवाहिका का पाठविल्या यावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सुशांतचं शवविच्छेदन ज्या इस्पितळात झालं तिथल्या कर्मचाऱ्यांशी सीबीआयने बोललं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. कोण करणार सुशांत प्रकरणाची चौकशी सुशांतच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ५० हून अधिक लोकांची चौकशी केली असून त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पण आतापर्यंत एकाही विरोधात एफआयर दाखल करण्यात आली नाही. दुसरीकडे, बिहार सरकारच्या शिफारशीनंतर केंद्राने सुशांतचा खटला सीबीआयकडे सोपविला आहे. सीबीआयने रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांसह एकूण सहा जणांविरूद्ध एफआयआर नोंदविली आहे. असं असलं तरी, सीबीआयच्या या चौकशीला महाराष्ट्र सरकारने विरोध केला आहे. आता सुशांतच्या प्रकरणाची किंवा मुंबई पोलीस नक्की कोण चौकशी करणार यावर सर्वोच्च न्यायायल लवकरच निर्णय देणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/315EwIF