मुंबई- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी पटणा पोलिसांत वडिलांना विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर या प्रकरणाची नव्याने चौकशी करत आहेत. यात आवश्यक त्या सर्व बाबींकडे बारकाईने पाहिले जात आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले याचा मुख्य तपास केला जात आहे. सुशांतच्या वडिलांनी आरोप केल्याप्रमाणे सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढण्यात आले आणि त्याला जाणीवपूर्वक फसवण्यात आलं. त्यांच्या या आरोपानंतर ईडीची टीमही या प्रकरणात लागली आहे. एका रिपोर्टनुसार, रियाने ९० दिवसांमध्ये सुशांतचे जवळपास ३ कोटी रुपये खर्च केले होते. एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बिहार पोलिसांच्या सूत्रांनी दावा केला की रियाने ९० दिवसांमध्ये ३ कोटी रुपये खर्च केले. आता ईडीची टीम या खर्चाचेही डिटेल्स मागवून घेणार आहे. बिहार पोलिसांनी बँकेचे स्टेटमेन्टही मागवून घेतले आहेत. रियावर आहे बिहार पोलिसांची बारीक नजर- या दरम्यान, बिहार पोलिसांच्या डीजीपींनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. सध्या सुशांतच्या मृत्यूची चौकशी प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे याबद्दल आत्ताच काही बोलणं चुकीचं असेल. तसेच बिहार पोलिसांच्या टीमने मीडिया समोर स्पष्ट केलं होतं की, गरज पडली तर ते रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवतील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hZD7ZS