Full Width(True/False)

बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेने दिली जॅग्वार कार

मुंबई- केस प्रकरणी चौकशी करायला मुंबई आलेल्या बिहार पोलिसांना सध्या मुंबई पोलिसांकडून आवश्यक ती मदत मिळत नाहीये. रिक्षा किंवा टॅक्सीतून सध्या पोलिसांची टीम वेगवेगळ्या घटनास्थळी पोहोचली आहे. बिहार पोलिसांना अंकिता लोखंडेच्या घरी जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटर अंतर चालत जावं लागलं होतं. यानंतर परतताना त्यांना इच्छितस्थळी सोडण्यासाठी अंकिताने तिची जॅग्वार कार दिली. जवळपास तीन किमी चालली बिहार पोलीस सुशांतच्या वडिलांनी यांनी पटणा येथे रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली. यानंतर तातडीने बिहारची टीम मुंबईत पोहोचली. सर्वसामान्यपणे एका राज्यातील टीम दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथली पोलीस टीम मदत करते. मात्र मुंबईत असं होताना दिसत नाही. करोना महामारीच्या या काळातही पोलीस रिक्षा आणि टॅक्सीमधून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहेत. अंकिताच्या घरी पोहोचण्यासाठी बिहार पोलिसांना जवळपास ३ किमी पायी जावं लागलं होतं. यामुळेच अंकिताने घरून निघताना त्यांना स्वतःची जॅग्वार गाडी दिली. रिक्षाही मिळाली नाही आणि टॅक्सीही नाही लॉकडाउनमुळे पोलिसांना रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्सी मिळायला खूप कष्ट पडले. याचमुळे त्यांना अंकिताच्या घरी जाण्यासाठी जवळपास तीन किलोमीटरचं अंतर पायी चालत जावं लागलं. बिहार पोलिसांना गाड्यांसंबंधी कोणतीच मदत करत नसल्यामुळे त्यांना रिक्षा आणि टॅक्सीवर पूर्णपणे अवलंबून रहावं लागत आहे. अंकिताच्या घरी पोहचल्यावर बिहार पोलिसांनी जवळपास १ तास तिची चौकशी केली. यानंतर परतताना त्यांना सोडण्यासाठी अंकिताने स्वतःची जॅग्वार गाडी दिली. या गाडीत अंकिताचा भाऊ आणि तिचा पीआर दिसत आहे. तर मागच्या सीटवर बिहार पोलीस बसले आहेत. या चौकशीत पोलिसांनी अंकिताला जवळपास ३० प्रश्न विचारले. पण अंकिताने या प्रश्नांची नेमकी काय उत्तरं दिली हे अजून कळू शकलेले नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2XjGhzK