Full Width(True/False)

अकाउंट रिकामे करताहेत हे २३ अॅप, तात्काळ डिलीट करा

नवी दिल्लीः द्वारे युजर्संना चुना लावल्याचे प्रकार लागोपाठ समोर येत आहे. अँड्रॉयड युजर्संना पुन्हा एकदा इशारा देत २३ मोबाइल अॅप्स तात्काळ डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे. हे अॅप्स युजर्संना माहिती न देता अकाउंट खाली करण्याचे काम करत असतात. सायबर सिक्योरिटी आणि सॉफ्टवेयर फर्म Sophos च्या शोधकर्त्यांनी या धोकादायक अॅप्सचा खुलासा केला आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे सर्व फ्लेसवेयर (fleeceware) अॅप्स आहेत. तसेच, त्यांनी गुगल प्ले स्टोरच्या पॉलिसीचे उल्लंघन केले आहे. वाचाः रिसर्चर जगदीश चंद्राइहा ने एका ब्लॉगपोस्ट मध्ये ही माहिती दिली आहे. गुगलच्या नवीन नियमाला भ्रमित मार्केटिंग डिस्प्ले कॉपी पकडण्यासाठी तयार केले आहे. यात काही कमतरता आहे. तर काही धोकादायक कामांना परवानगी देते. वाचाः काय आहे फ्लेसवेयर अॅप्स फ्लेसवेयर एक प्रकारचे मेलवेयर मोबाइल अॅप्लिकेशन आहे. जे लपलेल्या सब्सक्रिप्शन फीससोबत येतात. हे अॅप्लिकेशन त्या युजर्सचा फायदा उचलतात. ज्यांना माहिती नसते की, अॅप हटवल्यानंतर त्यांना सब्सक्रिप्शन कसे रद्द करायचे आहे. वाचाः कशाप्रकारे काम करतात हे अॅप्स हे अॅप्स युजर्संना अनेक प्रकारे चुना लावू शकतात. हे स्पॅम सब्सक्रिप्शन शिवाय युजर्संना फ्री ट्रायलच्या नावावर आकर्षित करतात. परंतु, हे सांगत नाहीत की हे सब्सक्रिप्शन कधी संपणार आहे. त्यानंतर किती चार्ज आकारला जाणार आहे. एक अन्य पद्धतीन टर्म आणि कंडिशन ला काही प्रकारे प्रदर्शित करतात परंतु, ते वाचणे जवळपास शक्य नसते. जगदीश यांनी सांगितले की, तुमच्याकडून एकदा साईन अप झाले की त्यांना सोपे जाते. काही वाचण्याआधीच अनेकांकडून परवानगी दिली जाते. तसेच सब्सक्राईब केले जाते. अनेकदा युजर्संना हेही माहिती नसते की, शेकडो अॅप्सचे सब्सक्रिप्शन सुरू झाले आहेत. वाचाः या अॅप्सना तात्काळ डिलीट करा Sophos रिसर्चर्स ने २३ अॅप्सची लिस्ट तयार केली आहे. ही यादी जारी करून तात्काळ मोबाइलमधून हटवण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही तुम्हाला या ठिकाणी या लिस्टसंबंधीत माहिती देत आहोत. तुमच्या मोबाइलमध्ये हे अॅप्स असतील तर तात्काळ डिलीट करा. वाचाः पाहा यादी. com.photoconverter.fileconverter.jpegconverter com.recoverydeleted.recoveryphoto.photobackup com.screenrecorder.gamerecorder.screenrecording com.photogridmixer.instagrid com.compressvideo.videoextractor com.smartsearch.imagessearch com.emmcs.wallpapper com.wallpaper.work.application com.gametris.wallpaper.application com.tell.shortvideocom.csxykk.fontmoji com.video.magiciancom.el2020xstar.xstar com.dev.palmistryastrology com.dev.furturescopecom.fortunemirror com.itools.prankcallfreelitecom.isocial.fakechat com.old.mecom.myreplica.celebritylikeme.pro com.nineteen.pokeradar com.pokemongo.ivgocalculatorcom.hy.gscanner वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hy90sW