मुंबई: अभिनेता याच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुशांतच्या वडिलांनी त्याची हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर या प्रकणाला वेगळं वळण आलं असून सुशांतची एक्स गर्लफ्रेंड देखील या सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण सर्वांसमोर यावं यासाठी पुढं आली आहे. अनेक वृत्त वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतल तिनं सुशांतच्या आयुष्यासंदर्भात अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. सुशांतच्या निधनानंतर अंकितानं केवळ सुशांतसाठीच पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळं तिच्या या पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहेत. सुशांतसाठी अंकितानं नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिनं सुशांतच्या आईचा फोटो शेअर केला आहे. अंकिताच्या हातात सुशांतच्या आईची फोटोफ्रेम आहे. या फोटोला अंकितानं दिलेलं कॅप्शनही भावुक असंच आहे.'आशा करते की, तुम्ही दोघं एकत्र असाल', असं कॅप्शन अंकितानं या फोटोला दिलं आहे. दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर अंकिता देखील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं सुशांतसाठी अनेक पोस्ट शेअर केल्यात, त्यामुळं तिचा आणि यांचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चा केवळ अफवा असल्याचं तिनं एका मुलाखतीतल म्हटलं आहे. मी विकीला डेट करतेय, आणि त्याच्यासोबत खूष आहे, असंही अंकितानं स्पष्ट केलं आहे. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताच्या आयुष्यात विकी जैन आला. अंकितानं काही महिन्यांपूर्वीच विकीसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. दोघांचा साखरपुडा देखील झाला असल्याच्या चर्चा आहेत. सुशांतच्या निधनानंतर विकीवर देखील नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यामुळं त्यानं सोशल मीडियावरंच कमेंट सेक्शन बंद केलं होतं. कुटुंबिय होते काळजीत गेल्यावर्षभरापासून सुशांत त्याच्या कुटुंबियांपासून दूरराहत होता. त्यांच्या जास्त संपर्कात येत नव्हता. त्यामुळं त्याचे कुटुंबिय देखील काळजीत होते. पूर्वी सारखं तो त्याच्या बहिणींसोबतही बोलत नव्हता, असं अंकिता म्हणाली. इतकंच नाही तर तो सतत त्याचे फोन नंबर बदलत होता. सुशांतच्या वडिलांकडे देखील त्याचा फोन नंबर नसायचा. ते मला फोन करून त्याचा फोन नंबर मागायचे, असंही अंकितानं मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. मी देखील ब्रेकअप झाल्यांतर त्याच्या संपर्कात नव्हते, त्यामुळं मलाही त्याच्याफोन नंबर माहित नव्हता, असं अंकितानं स्पष्ट केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ieDL5U