Full Width(True/False)

ओम राऊतला मिळाली 'बाहुबली'ची साथ, दोघं घेऊन येतायेत 'आदिपुरुष'

मुंबई- अजय देवगण स्टारर तानाजी सिनेमाचं दिग्दर्शन करणाऱ्या ओम राऊतने त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. यात त्याच्यासोबत ग्लोबल स्टार दिसणार आहे. '' असं या आगामी सिनेमाचं नाव आहे. नुकतीच प्रभास आणि ओमने सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा केली. सिनेमाच्या नावासोमत प्रदर्शित केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेता प्रभास आदिपुरुष ही मुख्य व्यक्तिरेखा साकारेल. टी-सीरिज या सिनेमाची निर्मिती करणार आहे. २०२२ मध्ये हिंदी, तेलगू, मल्याळण आणि कन्नड भाषाते हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. स्वतः प्रभासने सोशल मीडियावर आदिपुरुषचं पोस्टर प्रदर्शित करून याची घोषणा केली. या पोस्टरवर 'वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा आनंद' असं अनोखं कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. पोस्टरनुसार प्रभास या सिनेमात श्रीरामापासून प्रोत्साहित झालेला दिसत आहे. मात्र याबद्दल निर्मात्यांनी कोणताही खुलासा केला नाही. या सिनेमाच्या माध्यमातून प्रसाद सुथार हे निर्माते म्हणून पहिल्यांदा काम करत आहेत. याआधी ते अभिनेता अजय देवणगच्या एनवाय वीएफएक्सवालामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स डिझायनर म्हणून काम करत होते. त्यामुळे निश्चितपणे या सिनेमातील स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सची जबाबदारी अजय देवगणच्या या कंपनीकडे असू शकते. काही दिवसांपूर्वी श्री रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत रामाचं मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं. जर हा सिनेमा त्याच घटणेवर आधारित असला तर पौराणिक कथेवर तयार करण्यात येणारा हा पहिला सर्वात मोठा सिनेमा असेल. या सिनेमात स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचं काम मोठ्या प्रमाणावर असेल. धर्मा प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'ब्रह्मास्त्र' सिनेमाही भव्य दिव्य प्रमाणात तयार होत आहे. पण अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाची कथा काल्पनिक आहे. प्रभासच्या अन्य प्रोजेक्टबद्दल बोलायचे तर लवकरच तो दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. प्रभासचा हा त्याच्या करिअरमधला २१ वा सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाचं नावही प्रभास २१ असंच ठेवण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नाग अश्वीनला सोपवण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3awwTyi