मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गुढ अकल्पनीय आहे. हे गुढ सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सुशांत नैराश्यात होता असं रिया चक्रवर्ती आणि पोलिसांकडून सांगण्यात आलं. नैराश्यातूनच त्याने आत्महत्येचं पाऊल उचललं असं म्हटलं जात होतं. पण सुशांतला जवळून ओळखणारे त्याचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य सुशांत नैराश्यग्रस्त होता असं मानण्यास तयार नाहीत. आता सुशांतच्या अजून एका जवळच्या मित्रानेही याचा पुरावा दिला आहे. सुशांतचा जवळचा मित्र हा त्याच्या मालिकेचा दिग्दर्शक होता. कुशल सुशांतसिंह राजपूतचा जवळचा मित्र होता. तो अनेकदा सुशांतविषयी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतो. त्याचबरोबर इतरांप्रमाणे सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही तो सातत्याने करत आहे. आता कुशलने सुशांतच्या मानसिक स्थितीविषयी भाष्य केलं आहे. कुशलने सुशांतसोबतचे व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. त्यांच्या संभाषणातून जाणवतं की त्याला कोणत्याही तणावाचा सामना करावा लागला नव्हता. यात सुशांतने कुशलला पहिला मेसेज केला. यात त्याने कुशालची विचारपुस केली. 'भावा तू कसा आहेस.. तू उत्तम काम करत आहेस.. तुझी आठवण येते.. जय शिव शंभू… सुशांत.' सुशांतच्या या मेसेजला उत्तर देताना कुशलले लिहिले की, 'तुझ्याकडून हे ऐकून छान वाटलं. माझी तब्येत ठीक आहे. पण संघर्ष प्रत्येकासाठी आहे आणि मी त्याला अपवाद नाही. आशा आहे की तुझ्याबाबतीत सर्व काही ठीक असेल.' कुशलच्या मेसेजला उत्तर म्हणून सुशांतने त्याला आणखी एक मेसेज पाठवला. यात त्याने लिहिले की, 'मी स्वतःवर अध्यात्म्याच्यादृष्टीने काम करत आहे आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा पण मी आपल्याबद्दल विचार करतो, तेव्हा मी एकमेकांसोबत घालवलेले ते सूवर्ण क्षण फार मिस करतो. ते फार बहुमोल दिवस होते. मला एवढंच सांगायचं आहे की आपण जे एकत्र काम केलं त्यावर आपल्या साऱ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे आणि ते काम पुढे नेण्याचा मार्ग शोधला पाहिजे. जेणेकरून आपण सर्व नेहमी एकत्र राहू. कृपया, माझ्यावतीने सिदला खूपसारं प्रेम सांग आणि त्याला सांग की मला त्याची खूप आठवण येते.' सुशांत आणि कुशलचं हे बोलणं १ आणि २ जूनचं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या अवघ्या १२ दिवसांआधीच दोघं बोलले आहेत. दोघांमधलं हे संभाषण वाचून सुशांत नैराश्यात होता असं कोणालाही वाटणार नाही. विशेष म्हणजे याआधी कुशलने मीटूबद्दलही मोठा खुलासा केला होता. सुशांतवर जेव्हा मीटूचे आरोप करण्यात आले तेव्हा कुशल फार चिंतेत होता. अनेक रात्री त्याने सुशांतच्या विचारात जागून काढल्या होत्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34bboBK