हैदराबाद- प्रसिद्ध दिग्दर्शक यांचं प्रदीर्घ आजाराने हैदराबादमधील इस्पितळात निधन झालं. ते ५० वर्षांचे होते. जुलै महिन्यात कावीळ आणि पोट दुखीच्या त्रासामुळे हैदराबाद येथील गचीबोवली स्थित एआयजी इस्पितळात भरती करण्यात आलं. यावेळी त्यांना क्रॉनिक लिव्हर डिजीज आणि अन्य आजारांचं संक्रमण झाल्याचं कळलं होतं. यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. इस्पितळात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हॅपेटोलॉजिस्ट आणि वरिष्ठ सल्लागारांची टीम त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आली होती. त्यांची प्रकृती गंभीर असली तरी स्थिर असल्याचं इस्पितळाच्या प्रशासनाकडून आधी सांगण्यात आलं होतं. पण निशिकांत यांना झालेल्या आजारवर कोणतेही उपचार नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. अनेक सिनेमांचं केलं दिग्दर्शन निशिकांत कामत हे बॉलिवूडमधल्या नावाजलेल्या दिग्दर्शकांपैकी एक नाव आहे. यात अजय देवगणचा 'दृश्यम', इफान खानचा 'मदारी', जॉन अब्राहमचा 'फोर्स' आणि 'रॉकी हँडसम' या सिनेमांचा समावेश आहे. बॉलिवूडआधी त्यांनी अनेक मराठी सिनेमांचंही दिग्दर्शन केलं होतं. डोंबिवली फास्ट या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं. याशिवाय त्यांनी अभिनयातही आपलं नशिब आजमावलं होतं. भावेश जोशी सिनेमात त्यांनी काम केलं होतं. त्यासोबतच रॉकी हँडसम सिनेमात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kLKEOa