Full Width(True/False)

ईडीच्या चौकशीत सुशांतच्या वडिलांनी केले धक्कादायक खुलासे

पटणा- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर सुशांतच्या पैशांची अफरातफरी केल्याचा आरोप केला होता. रियाने सुशांतचे १५ कोटी रुपये घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर मनी लॉण्डिंग प्रकरणी ईडीनेही या प्रकरणात उडी घेतली. रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबियांविरोधात एफआयआर दाखल केली. आता ईडीने सुशांतचे वडील यांचा जबाबही नोंदवून घेतला आहे. आपल्या जबाबात केके सिंह यांनी आणि तिच्या कुटुंबियांविरोधात सुशांतचे १५ कोटी रुपये चोरल्याचा आरोप केला आहे. सुशांतची बहीण प्रियांका होती अकाउंट नॉमिनी सोमवारी ईडीकडून केके सिंह यांची सुमारे चार तास चौकशी केली गेली. ईडीच्या चौकशीत केके सिंह यांनी सांगितले आहे की सुशांतने त्याची मोठी बहीण प्रियांकाला त्याच्या बँक अकाउंटचं नॉमिनी केलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर बँकेनेच प्रियंकाला त्या खात्यातून १५ कोटी रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले गेल्याची माहिती दिली. संपूर्ण चौकशीत रिया चक्रवर्तीनेच सुशांतचे १५ कोटी रुपये घेतले या मुद्दायवर केके सिंह कायम राहिले. रियानेच केली श्रुती मोदीची नेमणूक सुशांतचे वडील केके सिंह यांनीही ईडीला सांगितले की सुशांतची खाती रिया चक्रवर्ती आणि श्रुती मोदी याच सांभाळायच्या. श्रुती मोदीची नियुक्ती रिया चक्रवर्तीनेच सुशांतची बिझनेस मॅनेजर म्हणून केली होती. या प्रकरणात ईडीने श्रुती मोदी आणि सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीचीही बराच काळ चौकशी केली. दरम्यान, रिया चक्रवर्तीने तिचं नवं स्टेटमेन्ट जारी केलं. या स्टेटमेन्टमध्ये तिने काही ठळक मुद्दे मांडले. आपल्या स्टेटमेन्टमध्ये रिया चक्रवर्ती नक्की काय म्हणाली- - रिया आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही आणि ती त्यांना कधीही भेटली नाही. - रियाचं मौन म्हणजे ती दुर्बल आहे असं समजू नये. सुशांतचं कुटुंब शिक्षित आहे आणि या कुटुंबात ओपी सिंह हे आयपीएस अधिकारी आहेत. कुटुंबियांकडून करण्यात आलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. - बिहार पोलिसांचं एफआयआर पूर्णपणे राजकीयदृष्टीने तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे रिया बेकायदेशीर तपासणीचा भाग होऊ शकत नाही. - अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासणीत ती सहकार्य करत आहे. मुंबई पोलीस आणि या दोघांनाही रियाची सर्व आर्थिक कागदपत्रं सोपविण्यात आली आहेत. या कागदपत्रातून तिच्यावर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट करतात. - रियाच्या खात्यांसह इनकम टॅक्स रिटर्नची तपासणी ईडीने केली आहे. या तपासणीत त्यांना रियाविरुद्ध कोणताही पुरावा मिळाला नाही. - रियाने सुशांतच्या खात्यातून एक रुपयाही ट्रान्सफर केला नाही. त्याच्या सर्व इनकम टॅक्स रिटर्न्सची चौकशी पोलीस आणि ईडीने केली आहे. - रिया आणि सुशांतच्या कुटुंबियांचे संबंध आधीपासूनच चांगले नव्हते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2E4dTv1