Full Width(True/False)

सॅमसंगच्या या ४० स्मार्टफोनमध्ये मिळणार ३ मोठे अँड्रॉयड अपडेट्स

नवी दिल्लीः ने आश्वासन दिले आहे की, सध्याच्या ४० स्मार्टफोनमध्ये ३ मोठे अँड्रॉयड ओएस अपडेट मिळणार आहे. याआधी सॅमसंगने गॅलेक्सी एस आणि गॅलेक्सी नोट फोनमध्ये नवीन पॉलिसी अंतर्गत अपडेट्स देण्याचे जाहीर केले होते. परंतु, आता या यादीत अपडेट मिळणाऱ्या डिव्हाइसेजचा समावेश केला आहे. पॉलिसी अंतर्गत गॅलेक्सी एस, गॅलेक्सी नोट, गॅलेक्सी झेड आणि गॅलेक्सी टॅब एस सीरीज आणि ए सीरीजच्या सर्व फोनला हे अपडेट्स मिळतील. वाचाः सॅमसंगने ही पण घोषणा केली आहे की, अँड्रॉयड ११ वर अपग्रेड होणार सर्वात पहिली डिव्हाईस गॅलेक्सी एस२० सीरीज असणार आहे. सॅमसंगने कंपनीच्या डिव्हाईसचा वापर करीत असलेल्या लेटेस्ट मोबाइल एक्सपिरियन्स देण्यासाठी आपला सपोर्ट जारी केला आहे. याआधी याच महिन्यात आपला गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये याची घोषणा केली होती. गॅलेक्सी एस आणि गॅलेक्सी नोटच्या फोनमध्ये अँड्रॉयड ओएस चे तीन जनरेशन पर्यंत अपडेट्स मिळणार आहेत. कंपनीने ३८ सॅमसंग गॅलेक्सी फोनची एक यादी जारी केली आहे. या सर्वांना अपडेट्स मिळणार आहेत. वाचाः अँड्रॉयडच्या ३ अपग्रेड्ससाठी सॅमसंगच्या या डिव्हाइसला मिळणार अपडेट्स Galaxy S20+ 5G Galaxy S20+ Galaxy S20 5G Galaxy S20 Galaxy S10 5G Galaxy S10+ Galaxy S10 Galaxy S10e Galaxy S10 Lite सॅमसंगच्या अपकमिंग गॅलेक्सी एस सीरीजच्या डिव्हाइसला अँड्रॉयड तीन जनरेशन साठी अपडेट्स मिळतील. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी नोट १० सीरीज Samsung Galaxy Note 20 Ultra 5G Galaxy Note 20 Ultra Galaxy Note 20 5G Galaxy Note 20 Galaxy Note 10+ 5G Galaxy Note 10+ Galaxy Note 10 5G Galaxy Note 10 Galaxy Note 10 Lite या शिवाय अपकमिंग नेक्स्ट जनरेशन गॅलेक्सी नोट सीरीजच्या डिव्हाईसला ३ मोठे अँड्रॉयड अपडेट मिळतील. सॅमसंग गॅलेक्सी फोल्डेबल डिव्हाइसेज Samsung Galaxy Z Fold 2 5G Galaxy Z Fold 2 Galaxy Z Flip 5G Galaxy Z Flip Galaxy Fold 5G Galaxy Fold अपकमिंग Z सीरीज डिवाइसेज सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीज Samsung Galaxy A71 5G Galaxy A71 Galaxy A51 5G Galaxy A51 Galaxy A90 5G वाचाः वाचाः गॅलेक्सी ए सीरीजमध्ये येत असलेल्या काही निवडक स्मार्टफोन्सला सुद्धा ३ मोठ अँड्रॉयड अपडेट मिळणार आहेत. सॅमसंग गॅलेक्सी टॅबलेट सीरीज Samsung Galaxy Tab S7+ 5G Galaxy Tab S7+ Galaxy Tab S7 5G Galaxy Tab S7 Galaxy Tab S6 5G Galaxy Tab S6 Galaxy Tab S6 Lite आगामी वाली Galaxy Tab S सीरीज ची डिवाइसेज सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोबाइल कम्यूनिकेशन्स बिझनेसचे सीनियर उपाध्यक्ष आणि हेड ऑफ सॉफ्टवेयर प्लॅटफॉर्म टीम जांगयून यू यांनी सांगितले की, या डिव्हाईसमध्ये सिक्योर प्रोटेक्शन आणि नवीन फीचर्स घेवून येण्यासाठी कंपनी काम करीत आहे. ज्याला लोक आधीच वापर करीत आहेत. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h6gRxC