Full Width(True/False)

रिया चक्रवर्तीने मुंबईत विकत घेतले होते दोन फ्लॅट

मुंबई- अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूच्या चौकशीसंदर्भात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची अंबलबजावणी संचालनालय () कडून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात आता अभिनेत्रीची संपत्ती समोर आली आहे. रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन फ्लॅट विकत घेतले होते. २०१८ मध्ये खार येथे एक फ्लॅट घेतला. या फ्लॅठची किंनत जवळपास ८० लाखांहून जास्त आहे. रिपोर्टनुसार, रियाचे घर खार (शिवालिक बिल्डर्स) मुंबई येथे आहे. या घराची किंमत जवळपास ८५ लाख रुपये होती. रियाने या घरासाठी २५ लाखांचे डाउन पेमेंट केले होते. तसेच ६० लाखांचं गृहकर्जही घेतलं होतं. रियाचा हा फ्लॅट तिच्या आईच्या संध्या चक्रवर्ती यांच्या नावावर आहे. त्याचवेळी रियाने वडिलांच्या नावाने दुसरे घर घेतले होते. २०१२ मध्ये घेतलेल्या या फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये होती. सुशांतसिंग राजपूतच्या आयुष्यात येण्यापूर्वी रिया चक्रवर्तीने ही दोन्ही घरं विकत घेतली होती. रिपोर्ट्सनुसार, रियाचं वार्षीक उत्पन्न १० लाख रुपयांवरून १४ लाख रुपयांवर गेले आहे. आता ईडीने तिच्याकडे आरटीआरचे निवेदन मागितले आहे. रिया चक्रवर्तीने अद्याप तिच्या आरटीआरविषयी कोणतीही माहिती ईडीला दिली नाही. या प्रकरणात, ती लवकरच आरटीआरची माहिती देईल असं सांगितलं. असं म्हटलं जातं की, तिच्या संपत्ती विषयी ईडीचे अधिकारी तिची पाच ते सात तास चौकशी करू शकतात. ईडीच्या चौकशी दरम्यान रिया चक्रवर्तीचा भाऊही तिच्यासोबत होता. तसेच सुशांतसिंग राजपूतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदीचीही ईडी कडून चौकशी करण्यात आली आहे. श्रुती मोदी, सुशांत सिंग राजपूत नंतर रियाची मॅनेजर होती. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये श्रुती मोदीच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा १४ जून रोजी राहत्या घरी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा तपास आता सीबीआयची टीम करणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2EUlqg4