नवी दिल्लीः टेक ब्रँड रियलमीकडून गेल्या आठवड्यात आपली C-सीरीज मध्ये तीन पॉवरफुल डिव्हाइसेज Realme C11, Realme C12 आणि चा समावेश करण्यात आला. या तिन्ही मध्ये सर्वात पॉवरफुल Realme C15 चा आज पहिला सेल आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आणि 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ६.५ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. याची सुरुवातीची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. आज दुपारी फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत साईटवर या सेलला सुरुवात होणार आहे. वाचाः किंमत आणि ऑफर्स Realme C15 चे दोन व्हेरियंट्स भारतीय मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे. आधी ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या मॉडलची किंमत ९९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे. या दोन फोनला पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर मध्ये लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनचा आज पहिला फ्लॅश सेल आहे. तर ऑफलाइन सेल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. वाचाः या सेलमध्ये फोनवर अनेक ऑफर्स मिळत आहेत. Realme.com वर ७ हजार रुपये किंमतीचे जिओ बेनिफिट्स दिले जात आहे. तर ५०० रुपयांपर्यंत मोबीक्विक कॅशबॅक मिळणार आहे. फ्लिपकार्टवर ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के डिस्काउंट अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्ड मिळत आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय वर खरेदी केले जावू शकते. वाचाः Realme C15 चे वैशिष्ट्ये रियलमीच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (720x1600 पिक्सल्स) डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर Helio G35 देण्यात आला आहे. ४ जीबी पर्यंतच्या LPDDR4x रॅमसोबत येतो. फोनमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मिळतो. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत ते वाढवता येवू शकते. वाचाः फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सलचा रेट्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी Realme C15 मध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनच्या रियर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31uZ39O