नवी दिल्लीः स्मार्टफोन मार्केटमध्ये २०२० चढ-उतार पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या चांगल्या विक्रीनंतर लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. सध्या टॉप कंपन्या नवीन फोन लाँच करीत आहे ऑनलाइन ओन्ली लाँच इंव्हेटमध्ये जबरदस्त विक्री झाली आहे. ही विक्री सुरूच आहे. अॅनालिटिक्स कंपनी कडून टॉप १० सर्वात जास्त विक्रीच्या फोनची यादी शेयर करण्यात आली आहे. वाचाः वाचाः Apple iPhone 11 अॅपलने २०२० च्या पहिल्या सहामाहीत आपला २०१९ च्या लाइनअपचा स्टँडर्ड डिव्हाईसची ३.७७ कोटी युनिट्सची विक्री झाली आहे. आयफोन ११ ची सुरुवातीची किंमत आता ६४ हजार ९०० रुपये आहे. Samsung Galaxy A51 सर्वात प्रसिद्ध अँड्रॉयड डिव्हाईस म्हणून २०२० च्या पहिल्या सहामाहीत Samsung Galaxy A51 समोर आला आहे. या फोनची १.१४ कोटी युनिट्सची विक्री झाली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. Xiaomi Redmi Note 8 रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, रेडमी नोट ८ ला पहिल्या सहा महिन्यात १.१ कोटी फोनची विक्री झाली आहे. हा फोन बजेट स्मार्टफोन म्हणून ओळखला जातो. या फोनला १२हजार ७९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. वाचाः वाचाः Xiaomi Redmi Note 8 Pro शाओमीची नोट सीरीजमधील फोन खूप प्रसिद्ध आहे. पॉवरफूल फीचर्स असलेल्या Xiaomi Redmi Note 8 Pro ला २०२० मधील पहिल्या सहामाहीत १.०२ कोटी फोनची विक्री झाली आहे. फोनची सुरुवातीची किंमत १७ हजार रुपये आहे. Apple iPhone SE अॅपलचा स्वस्त आयफोन मॉडल Apple iPhone SE चे जवळपास ८७ लाख फोनची विक्री झाली आहे. हा फोन भारतात ३७ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येवू शकतो. Apple iPhone XR Omdiaच्या रिपोर्टमध्ये अॅपलचा हा प्रसिद्ध आयफोन एक्सआर सहाव्या स्थानावर आहे. कंपनीने या फोनची जवळपास ८० लाख विक्री केली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ४७ हजार ५०० रुपये आहे. वाचाः वाचाः iPhone 11 Pro Max अॅपलचा सर्वात पॉवरफुल आयफोन सुद्धा टॉप १० च्या यादीत आहे. या फोनची ७७ लाख युनिट्सची विक्री झाली आहे. या आयफोनची भारतात सुरुवातीची किंमत १ लाख ११ हजार ६०० रुपये आहे. Xiaomi Redmi 8A या यादीत सर्वात कमी किंमतीचा स्मार्टफोन Xiaomi Redmi 8A आहे. या फोनची ७३ लाख युनिट्स ग्लोबली विक्री झाली आहे. भारतात या फोनची किंमत ७ लाख ४९९ रुपये आहे. Xiaomi Redmi 8 १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या सेगमेंटमध्ये Xiaomi Redmi 8 ची खूप विक्री झाली आहे. या फोनची ६८ लाख विक्री झाली आहे. भारतात या फोनची किंमत ९९९९ रुपये आहे. Apple iPhone 11 Pro या यादीत अॅपलचा हा पाचवा आयफोन Apple iPhone 11 Pro आहे. या फोनची ६७ लाख विक्री झाली आहे. भारतात या फोनची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m7rrqP