Full Width(True/False)

आता गुगल सांगणार कोण कॉल करतेय, नवीन फीचरमुळे TrueCaller ची सुट्टी

नवी दिल्लीः सर्च इंजिन कंपनी गुगलकडून नुकताच फीचरची घोषणा करण्यात आली आहे. याला Google Phone अॅप्सचे भाग बनवले आहे. गुगलचे हे फीचर सांगणार की, तुम्हाला कोण कॉल करीत आहे. नवीन फीचर आणण्यामागे कॉल फ्रॉड्स हे कारण सुद्धा आहे. हे फीचर ला टक्कर देवू शकते. वाचाः भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्स मोठी समस्या आहे. तसेच Verified Calls फीचर रोलआउट करण्यासोबतच युजर्संना यापासून वाचवता येवू शकते. बिजनेस कॉलच्या स्थितीत युजर्सला दिसेल की, कोण कॉल करतो, व का कॉल करतोय. हे फीचर भारत, स्पेन, ब्राझील मेक्सिको आणि यूएस सह जगभरात रोलाऊट केले जात आहे. वाचाः वाचाः TrueCaller अॅपची गरज नाही सध्या TrueCaller अॅप असे आहे जो हे फंक्शन युजर्संना ऑफर करतो. Google Phone अॅपमध्ये हे फीचर्स आल्यास हे फीचर युजर्सच्या डिव्हाईसचा भाग बनेल. म्हणजेच कोणताही अॅप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही. Verified Calls ही TrueCaller अॅपचे काम करेन. एका ब्लॉग पोस्टमध्ये गुगलने लिहिले की, पायलट प्रोग्रॅमच्या सुरुवातीला रिझल्ट्स खूप चांगले राहिले आहे. युजर्संना याचा फायदा नक्की मिळेल. वाचाः वाचाः Google Phone मध्ये नवीन फंक्शन गुगलच्या पिक्सल सीरीज शिवाय खूप अँड्रॉयड फोन्समध्ये डिफॉल्ट Google Phone अॅप हेच डायलर चे काम करीत असतात. या सर्व फोन्समध्ये नवीन फीचर अपडेटसोबत मिळेल. जर फोनमध्ये Google Phone अॅप इन्स्टॉल नसेल तर गुगल प्ले स्टोरवरून ते इंस्टॉल केले जावू शकते. गुगलचे हे नवीन फीचर्स युजर्संना बिझनेस कॉल जाणून घ्यायचे कारण, सुद्धा सांगणार आहे. हे फीचर अद्याप TrueCaller मध्ये उपलब्ध नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hdtqGz