Full Width(True/False)

टायगर श्रॉफनंही केली होती चेहऱ्याची सर्जरी; पाहा व्हिडिओ

मुंबई :अनेक कलाकार अधिक सुंदर दिसण्यासाठी करून घेत असतात. या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या चेहऱ्यात खूप बदल होतो. अभिनेता यानंही अशी शस्त्रक्रिया करून घेतली होती. त्यानं नुकताच त्याचा एक जुना फोटो शेअर केला. सहा वर्षांपूर्वी त्यानं 'हिरोपंती' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. मात्र त्यापूर्वी तो कसा दिसायचा हे त्यानं त्या फोटोमधून चाहत्यांना सांगितलं आहे. 'करिअरच्या सुरुवातीला मी असा दिसायचो. दाढी सोडली तर दुसरा कुठलाही बदल माझ्या चेहऱ्यात जाणवत नाही', अशा आशयाची पोस्ट त्यानं फोटोसोबत लिहिली आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नृत्य आणि अॅक्शन यामुळे पहिल्याच चित्रपटातून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण, त्याच्या लूकमुळे अनेकांनी त्याची खिल्लीसुद्धा उडवली होती. नंतर त्यानं प्लास्टिक सर्जरी करून घेऊन लूकमध्ये थोडा बदल केला होता. पण, त्याच्या पूर्वीच्या आणि आताच्या लूकमध्ये फारसा बदल झालेला नसल्याचं तो म्हणतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39sIhfY