नवी दिल्लीः एचएमडी ग्लोबलकडून लवकरच दोन बजेट स्मार्टफोन आणि भारतात लाँच केले जावू शकते. या फोनला काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये उतरवण्यात आले आहे. या फोनला नोकिया इंडिया वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. याची किंमत सुद्धा समोर आली आहे. दोन्ही स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत १० हजार रुपयांच्या जवळपास आहे. यात अँड्रॉयड १०, फिजिकल फिंगरप्रिंट स्कॅनर आणि डेडिकेटेड गुगल असिस्टेंट बटन दिले आहे. वाचाः नोकिया ३.४ मध्ये पंच होल डिझाईन सेल्फी कॅमेरा दिला आहे. दमदार परफॉर्मन्स साठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर सोबत येतो. यात रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तर स्वस्त नोकिया २.४ मध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले, ड्यूल रियर कॅमेरा सेटअप आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. नोकिया इंडिया वेबसाइटवर लिस्टिंग करण्यात आलेल्या ऑप्शनमध्ये कलर सुद्धा कन्फर्म केला आहे. यात ब्लॅक, ग्रे आणि स्काय ब्लू कलरमध्ये खरेदी केला जावू शकतो. वाचाः नोकिया ३.४ चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. 1600x720 पिक्सल्स रिझॉल्यूशन दिला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर सोबत ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. रियर पॅनेलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मध्ये १३ मेगापिक्सलचा मेन सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर दिला आहे. ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि फोनला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः नोकिया २.४ चे वैशिष्ट्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले (1600x720) दिला आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर दिला आहे. ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १० मिळते. तसेच अँड्रॉयड ११ अपडेट लवकरच मिळू शकते. फोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तसेच फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3csRV1y