Full Width(True/False)

यापूर्वी गरज वाटली नाही; पण आता...अमृता सुभाषचा अनुरागला पाठिंबा

मुंबई: बॉलिवूड दिग्दर्शक याच्यावर अभिनेत्री हिनं लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर नवीन वादाला सुरुवात झाली आहे. अनुरागवर आरोप झाल्यानंतर त्यानं ट्विट करत सर्व आरोप फेटाळले आहे. तर त्याच्यासोबत काम केलेल्या अनेक अभिनेत्रींनी त्याला पाठिंबा देत सोशल मीडियावर अनुरागबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहे. तापसी पन्नू, यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अनुरागला पाठिंबा दिल्यानंतरल मराठी अभिनेत्री हिनं देखील अनुरागबद्दल असा अनुभव कधीही आला नसल्याचं म्हटलं आहे. अमृतानं अनुरागसोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. मी आतापर्यंत भेटले त्यापैकी तू एक प्रामाणिक, प्रेमळ आणि खऱ्या मनाचा व्यक्ती आहेस. तू नेहमीच माझा आदर केलास आणि सेटवर असलेल्या सर्वांचाच. यापूर्वी हे शब्दांत लिहिण्याची आपल्या नात्यात मला गरज वाटली नाही. पण तू दिलेल्या आदराबद्दल, तुझे आभार', असं अमृतानं म्हटलं आहे. अमृतानं अनुरागसोबत यापूर्वी तीन वेळा काम केलं आहे. या पूर्वी देखील तिनं तिचा अनुभव शेअर केला होता. 'अनुराग कश्यप हा असा दिग्दर्शक आहे. जो कधीही एखाद्या चौकटीत काम करत नाही. आयत्या वेळीदेखील तो पूर्ण सीन बदलून टाकतो. चित्रीकरणात कलाकारांना इम्प्रोवायझेशन करण्याची पूर्ण मोकळीक असते. तो कधीच सीन पूर्ण झाल्यावर 'कट' असं म्हणतं नाही. कलाकार इम्प्रोवाझेशननं पुढे आपापल्या परीनं संवाद घेत असतात. पण, या सगळ्यातून होतं असं की प्रत्येक सीन खूप खरा वाटतो. अनुरागची एक गोष्ट आणखी सांगायला हवी ती म्हणजे; त्याचा मित्र परिवार मोठा आहे. पण, मित्र-मैत्रीण आहे म्हणून तो कधीच त्याच्या सिनेमांमध्ये भूमिका देत नाही. प्रत्येकाची तो ऑडिशन घेतो. मी देखील 'रमण राघव', 'सेक्रेड गेम्स' आणि आता 'चोक्ड'साठी ऑडिशन दिली होती. त्या प्रत्येक भूमिकेला नेमकं काय अपेक्षित आहे, हे पाहूनच तो कास्टिंग करतो. त्यामुळे कदाचित त्याच्या चित्रपटातल्या प्रत्येक भूमिका नैसर्गिक आणि खऱ्याखुऱ्या वाटतात.' असं अमृता म्हणाली होती. पायल घोषने काय केले आहेत आरोप?बॉलिवूड अभिनेत्री हिनं अनुरागवर आरोप केलेत. यासंदर्भात तिनं एक ट्विट देखील केलं आहे. 'अनुराग कश्यप यान माझ्यासोबत असभ्य आणि गैरवर्तन केलं असून मला वाईट वागणूक दिली गेली होती. या व्यक्तीवर कारवाई करा. या माणसाचं खरं रुप सर्वांसमोर येईल. माझ्या या ट्विटमुळे माला जीवाला धोका असून माझी मत करा', असं तिनं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हे ट्विट करताना पायलनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं आहे आणि त्याच्याकडे मदत मागितली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3hNa7Ef