Full Width(True/False)

Xiaomi पासून ते Vivo पर्यंत... या ७ स्मार्टफोन्ससाठी आता मोजावे लागणार अधिक पैसे

गेल्या काही दिवसात स्मार्टफोन कंपन्यांनी त्यांच्या डिव्हाइसच्या किंमतीत मोठी वाढ केल्याचे पाहायला मिळत आहे. फोनची किंमत वाढवणाऱ्या या कंपन्यांमध्ये Xiaomi, Realme, Vivo, Micromax सह इतरांचा समावेश आहे. सरकारने जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढल्यानंतर २०२० मध्ये स्मार्टफोनच्या किंमती वाढल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता या फोनच्या किंमती वाढण्यामागे काय कारण आहे, हे स्पष्ट झालेले नाही. ऑटो आणि पीसी इंडस्ट्री प्रमाणेच स्मार्टफोन इंडस्टरी देखील सेमिकंडक्टरच्या तुटवड्याचा सामना करत आहे. २०२१ मध्ये स्मार्टफोनच्या विक्रीत १२ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. असे असले तरीही काही गोष्टींमुळे ग्राहकांना स्मार्टफोनसाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. यामध्ये Redmi Note 10, Realme C25s, Vivo Y1s, Vivo Y12s सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोन्सची किंमतीत किती वाढ झाली आहे, ते जाणून घेऊया.

Redmi Note 10
Redmi Note 10

Redmi Note 10 या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटच्या किंमतीत १ हजार रुपये वाढ झाली होती. हा स्मार्टफोन १३,९९९ रुपये किंमतीत लाँच झाला होता. मात्र आता फोनसाठी १४,९९९ रुपये मोजावे लागणार आहेत. Redmi Note 10 हा दमदार स्मार्टफोन Qualcomm Snapdragon ६७८ प्रोसेसर सोबत येतो. तसेच रेडमीच्या या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत देखील ११,९९९ रुपयांवरून १२,४९९ रुपये झाली आहे.

Realme C25s
Realme C25s

रियलमी सी२५एस या स्मार्टफोनची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. Realme C25s च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आता १०,४९९ रुपये आहे. तर १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ११,४९९ रुपयात खरेदी करता येईल. यात ६.५ इंचाचा फूल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme C25s स्मार्टफोनमध्ये ६००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळतो.

Vivo Y1s
Vivo Y1s

Vivo Y1s या स्मार्टफोनच्या २ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. या फोनला ७,९९० रुपयात लाँच करण्यात आले होते. मात्र आता हा फोन ८,४९० रुपयात उपलब्ध आहे. Vivo Y1s स्मार्टफोन MediaTek Helio P३५ प्रोसेसर सोबत येतो व यात पॉवरसाठी ४,०३० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोनमध्ये सेल्फीसाठी फ्रंटला ५ मेगापिक्सल आणि रियरला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा सेसंर मिळतो. हा फोन अँड्राइड १० वर आधारित Funtouch OS १०.५ वर चालतो.

Vivo Y12s
Vivo Y12s

Vivo Y12s स्मार्टफोनच्या किंमतीत ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. या फोनला ९,९९० रुपयात लाँच करण्यात आले होते. आता हा फोन १०,४९० रुपयात उपलब्ध आहे. ही ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत आहे. Vivo Y12s स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon ४३९ प्रोसेसर मिळतो व पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

Redmi Note 10 Pro
Redmi Note 10 Pro

Redmi Note 10 Pro या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढली आहे. या फोनला १६,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. आता हा फोन १७,९९९ रुपयात ऑनलाइन उपलब्ध आहे. Redmi Note 10 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon ७३२G octa-core प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर रियरला ६४ मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

Motorola Moto G40 Fusion
Motorola Moto G40 Fusion

Motorola Moto G40 Fusion स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमसह येणाऱ्या बेस मॉडेलमध्ये ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. या फोनच्या ६ जीबी रॅम मॉडेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. ४ जीबी रॅम व्हेरिएंटला १३,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. आता हा फोन १४,४९९ रुपये किंमतीत खरेदी करता येईल. Motorola Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी पॉवरफूल ६००० एमएएचची बॅटरी मिळते. तर यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

Micromax In Note 1
Micromax In Note 1

मायक्रोमॅक्सने देखील आपल्या फोनच्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने Micromax In Note 1 या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५०० रुपयांनी वाढवली आहे. या फोनला १०,९९९ रुपयात लाँच करण्यात आले होते. आता या फोनला तुम्ही ११,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनमध्ये रियरला क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. तर पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d5hGqk