नवी दिल्ली: अखेर सॉफ्टवेअर दिग्गज मायक्रोसॉफ्टने आपल्या च्या किंमती जाहीर केल्या आहेत. कंपनीने जुलैमध्ये मायक्रोसॉफ्टच्या व्हर्च्युअल इव्हेंट इन्स्पायर २०२१ मध्ये विंडोजची पुढची पिढी ओएस दाखल केली होती. त्यानंतर कंपनीने आता Windows 365 ची किंमत २० डॉलर (सुमारे १,५५५ रुपये)जाहीर केली आहे. माहितीनुसार, Windows 365 आणि एंटरप्राइझ या दोन आवृत्त्यांमध्ये खरेदी करता येईल. युजर्स विंडोज ३६५ डेस्कटॉप, लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये देखील वापरू शकतील. वाचा: Windows 365 मध्ये काय विशेष असेल? Windows 365 बिझनेस एडिशन विशेषतः युजर्सना अॅझूर सबस्क्रिप्शन किंवा डोमेन कंट्रोलरची आवश्यकता नसलेल्या ठिकाणी प्रवेश करणे सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. कारण सर्व घटक मायक्रोसॉफ्ट क्लाउडमध्ये चालत आहेत आणि मायक्रोसॉफ्टच ते व्यवस्थापित करते. Windows 365 बिझनेससाठी तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट ३६५ सदस्यत्व असणे आवश्यक आहे. तर, विंडोज ३६५ एंटरप्राइझ अशा संस्थांसाठी आहे ज्यांच्याकडे आयटी सेटअप आहेत. हे युजर्सना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रॅम, सीपीयू आणि स्टोरेज आकार सुधारण्यासाठी आकार बदलण्याची वैशिष्ट्ये प्रदान करते. Windows 365 वर मिळणार PC सारखा अनुभव दोन आवृत्त्या असूनही विंडोज ३६५ क्लाउडला पीसीसारखा अनुभव असेल असा कंपनीचा दावा आहे. ज्याला वेब ब्राउझरवरून कोणत्याही विंडोज, मॅक, आयपॅड आणि अँड्रॉईड डिव्हाइसद्वारे ऍक्सेस करता येते. Windows 365 ची भारतातील किंमत भारतात Windows 365 ची किंमत प्रति वापरकर्ता सुमारे १,५५५ रुपयांपासून १२,२९५ रुपयांपर्यंत आहे . Windows 365 बिझनेस आणि विंडोज ३६५ एंटरप्राइझमध्ये समान प्रारंभिक आणि टॉप-एंड किंमती आहेत. तर, Windows 365 बिझनेस एसकेयू प्रत्येक संस्थेसाठी ३००० वापरकर्त्यांपर्यंत मर्यादित आहे. कंपनीच्या मते, वापरकर्त्यांना मूळ विंडोज ३६५ बिझनेस एसकेयूसाठी विंडोज हायब्रिड फायदे मिळाले आहेत. जे फक्त वैध विंडोज १० प्रो परवाना असलेल्या ग्राहकांसाठी असेल. त्याचे सिंगल व्हर्च्युअल कोर प्रोसेसर, २GB रॅम आणि ६४GB स्टोरेजसाठी दरमहा १,५५५ रुपये खर्च येईल. तर, दुसरीकडे, जर तुम्ही दोन व्हर्च्युअल कोर आणि ४GB रॅमसह अपग्रेड केले तर त्याची किंमत २,१८० रुपये असेल. जर तुमच्याकडे विंडोज १० प्रो परवाना नसेल, तर तुम्हाला विंडोज ३६५ बिझनेसची मूळ आवृत्ती मासिक १,८६५ रुपयांना खरेदी करावी लागेल. टॉप-एंड एसकेयू ८ व्हर्च्युअल कोर ३२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह येतो. हे खरेदी करण्यासाठी, प्रत्येक युजरला १२,२९५ रुपये मासिक भरावे लागतील. तसेच, ज्या नियमित युजर्सकडे आधीपासूनच विंडोज नाहीत, ते मासिक १२,६०५ रुपयांना ते खरेदी करू शकतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rSRbdY