मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनंतर मलायका अरोराचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराने याला दुजोरा दिला आहे. काही तासांपूर्वी अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुन होम क्वारन्टाइन राहणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. अर्जुनमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. दरम्यान, मलायकाच्या 'इंडियाज बेस्ट डान्सर्स' या शोच्या सेटवर काही दिवसांपूर्वी सात जणांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आलं होतं. मलायका अरोराच्या सेटवर सात लोक करोना पॉझिटिव्ह काही दिवसांपूर्वी मलायका अरोराचा टीव्ही शो इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर सात लोक करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. यानंतर तातडीने या शोचं चित्रीकरण बंद करण्यात आलं. मलायका आधीपासूनच या शोवर येण्यास घाबरत होती. पण तिची मनधरणी केल्यानंतर तिला परत शोमध्ये बोलावण्यात आलं होतं. बोनी कपूर यांचा स्टाफही होता पॉझिटिव्ह काही महिन्यांपूर्वी बोनी कपूर यांच्या घरातला स्टाफही करोना पॉझिटिव्ह होता. असं असलं तरी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही करोनाची लागण झाली नव्हती. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. अमिताभ आणि अभिषेक बच्चनही होते करोना पॉझिटिव्ह काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांनाही करोनाची लागण झाल्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर ऐश्वर्या राय- बच्चन आणि आराध्या बच्चनही करोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं होतं. सेलिब्रिटींनी दिल्या लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा अर्जुनने तो करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याच्या स्टेटसवर जान्हवी कपूर, सिद्धांत कपूर, हर्षवर्धन कपूर, मुकेश छाब्रा, आएशा श्रॉफ आणि क्रिती सेनॉन यांनी प्रतिक्रिया दिल्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32ZTgsE