नवी दिल्लीः रेडमीचे लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Redmi 9 आणि Redmi 9 Prime ला आज खरेदी करण्याची संधी आहे. आज दुपारी १२ वाजता या फोनचा सेल आयोजित करण्यात आला आहे. युजर्स या फोनला अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वरून खरेदी करू शकतो. दोन्ही फोन मध्ये बजेट नुसार बेस्ट इन क्लास फीचर दिले आहेत. आजच्या या सेलमध्ये आणि रेडमी ९ प्राईमला काही आकर्षक ऑफरमध्ये खरेदी करू शकता. वाचाः रेडमी ९ आणि रेडमी ९ प्राईमची किंमत आणि ऑफर दोन व्हेरियंट मध्ये म्हणजे ४ जीबी प्लस ६४ जीबी आणि ४ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये येतो. मॅट ब्लॅक, मिंट ग्रीन, स्पेस ब्लू आणि सनराईज फ्लेयर कलर ऑप्शनमध्ये येणाऱ्या या फोनची सुरुवातीची किंमत ९९९९ रुपये आहे. रेडमी ९ च्या फोनची सुरुवातीची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजसोबत आणि १२८ जीबी स्टोरेज सोबत येतो. रेडमी ९ कार्बन ब्लॅक, स्काय ब्लू आणि स्पोर्टी ऑरेंज कलर मध्ये येतो. आजच्या या सेलमध्ये दोन दोन्ही फोनला आकर्षक बँक कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी केले जावू शकते. वाचाः रेडमी ९ प्राईमचे वैशिष्ट्ये फोनमध्ये 1080x2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G80 SoC प्रोसेसर दिला आहे. ५१२ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट सोबत असलेल्या या फोनमध्ये अँड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 11 ओएसवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले आहेत. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा सेकंडरी शूटर, एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5,020mAh बॅटरी दिली आहे. वाचाः रेडमी ९ चे वैशिष्ट्ये रेडमी ९ मध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५३ इंचाचा एचडी प्लस डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅमच्या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिला आहे. गरज पडल्यास स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोन अँड्रॉयड 10 वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jTAwla