Full Width(True/False)

उद्धव ठाकरेंऐवजी फडणवीस मुख्यमंत्री असते तर… कंगनाची टिव टिव सुरूच

मुंबई: महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त विधाने केलेली अभिनेत्री हिमाचल प्रदेशला परतली आहे. तिथं ती आता दहा दिवस क्वारंटाइन राहणार आहे. असं असलं तरी कंगनाची टिवटिवाट सुरूच आहे. कंगनानं नुकतच एक ट्विट केलं आहे. महराष्ट्रात ठाकरे ऐवजी फडणवीस सरकार असतं तर ही वेळ आली नसती ,असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सध्या सुशांतच्या मृत्यूचा तपास सुरू असताना एनसीबीकडून बॉलिवूडच्या ड्रग्ज संदर्भात कनेक्शनचाही तपास केला जात आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी संरक्षण हवं आहे, अशी कंगनानं मागणी केली होती. परंतु मुंबई पोलिसांचं संरक्षण नको ,महाराष्ट्रातील सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचं म्हणत कंगनानं मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. आज पुन्हा नवीन ट्विट करत कंगनानं ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.' राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्याकडं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असतं तर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य मार्गानं झाला असता', असं कंगनानं तिच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना वादग्रस्त ट्विट करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. सुशांतसिंह प्रकरणात घराणेशाहीवरून वाद निर्माण केल्यानंतर कंगनानं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्रातील राज्य सरकारवर टीका करणं सुरू केलं मुंबई पोलिसांवर आरोप करीत त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ सुरू आहे. दरम्यान, सतत वादग्रस्त वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहणाऱ्या अभिनेत्री कंगनानं मुख्यमंत्री यांचा एकेरी शब्दांत उल्लेख करतानाच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. खासकरून शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर मुंबईतील तिच्या बेकायदा बांधकामावर हातोडा पडल्यानंतर कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कंगनाच्या कथित अमली पदार्थ व्यवहारप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत. कंगना ही अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा दावा अभिनेता शेखर सुमनचा मुलगा यानं एका मुलाखतीत केला होता. त्या मुलाखतीचा हवाला देऊन नुकत्याच झालेल्या मुंबईतील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी सभागृहात लावून धरली होती. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलिस करतील, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. अध्ययन सुमननं चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात कंगनानं आपल्याला कोकेन हा अमली पदार्थ घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययननं केला आहे. 'आपण हॅश ट्राय केले, पण ते आवडले नाही, त्यामुळंच आपण कोकेन घेण्यास नकार दिला. त्यामुळे कंगनाशी कडाक्याचं भांडणही झालं होतं' असेही अध्ययननं म्हटलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Rr6HfR