Full Width(True/False)

तीन वाजता होणार सुनावणी, BMC ला द्यावी लागेल नुकसान भरपाई?

मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेने कंगना रणौतचं वांद्रे येथील कार्यालय तोडून तिचं खूप मोठं आर्थिक नुकसान केलं. बीएमसीने कंगनाने बेकायदेशीर बांधकाम केल्याचं सांगत तिच्या कार्यालयावर हातोडा चालवला होता. आता न्यायालयात हा खटला गेला आहे. जर कंगनाने तिने केलेलं बांधकाम बेकायदेशीर नसल्याचं सिद्ध केलं तर बीएमसीला मोठा धक्का बसू शकतो. या प्रकरणी आज (गुरुवारी) दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे. जर कंगना ही केस जिंकली तर बीएमसीला तिच्या नुकसान भरपाईची सगळी रक्कम द्यावी लागेल. पालिकेने बुधवारी कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. यावरच गुरुवारी दुपारी ३ वाजता न्यायालयात सुनावणी आहे, ज्यामध्ये बीएमसीला या कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. तसेच कंगनाकडे असलेल्या कागदपत्रांमधून तिने विकत घेतलीले जागा आणि त्यात केलेलं बांधकाम अधिकृत आहे, तर बीएमसीला तिला संपूर्ण बांधकाम पुन्हा बांधून द्यावं लागणार आहे. बीएमसीच्या दाव्यानुसार चुकीचं केलेलं बांधकाम पाडलं बीएमसीचा दावा आहे की त्यांनी कंगनाने नुकत्याच केलेल्या नूतनीकरणात ज्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने केल्या होत्या त्याच मोडल्या आहेत. असं असलं तरी कंगनाने अनेक ट्वीटमध्ये वारंवार म्हटलं आहे की तिच्या ऑफिसमध्ये कोणतंही अनधिकृत बांधकाम करण्यात आलं नव्हतं. एका ट्वीटमध्ये तिने लिहिलं की २४ तासांत तिचं कार्यालय अचानक बेकायदेशीर झालं आणि फर्निचरसह अनेक गोष्टी तोडण्यात आल्या. उच्च न्यायालयानेही महापालिकेच्या या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी कंगनाचं वांद्रे येथील कार्यालय तोडल्यानंतर अनेकांनी बीएमसीवर नाराजी व्यक्त केली. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कार्यालयाची आणखी तोडफोड करण्यासही बंदी घातली. पण कंगनाच्या लीगल टीमने जेव्हा स्टे घेतला तोपर्यंत कंगनाचं ८० टक्के नुकसान झालं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2ZmW8Ph