मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. यापुढे सीआरपीएफ कमांडो कंगनाचं संरक्षण करणार आहेत. सीआरपीएफचं संरक्षण मिळालेली कंगनाही पहिली बॉलिवूड स्टार झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह जवळपास देशातील ६० हाय- प्रोफाइल व्यक्तींना सीआरपीएफ संरक्षण देतं. आता या मांदियाळीत आता कंगनाही जाऊन बसली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षा देतात सीआरपीएफ कमांडो रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नीला नीता अंबानी यांनाही सीआरपीएफ कमांडो सुरक्षा देतात. मुकेश अंबानी यांना झेड-प्लस तर निता अंबानी यांना व्हाय-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. असं असलं तरी सरकारकडून मिळालेल्या संरक्षणाच्या बदल्यात अंबानी यांना ठराविक रक्कम सरकारला द्यावी लागते. आता कंगना रणौतला देण्यात आलेल्या सुरक्षेसाठी कंगनाला पैसे द्यावे लागतात की नाही हे अजून कळलं नाही. २४ तास असेल कंगना रणौतला सुरक्षा कंगना रणौतला देण्यात आलेल्या व्हाय-प्लस सुरक्षेअंतर्गत १० ते ११ सशस्त्र कमांडोद्वारे २४ तासांची स्वतंत्र सुरक्षा दिली जाईल. कंगनाच्या सुरक्षेत २-३ सशस्त्र पीएसओदेखील असतील जे तिच्यासोबत सतत असतील तर इतर सुरक्षा कर्मचारी तिच्या निवासस्थानी असतील. एका अधिकाऱ्याने सांगितलं की कंगनाच्या घराबाहेर येणाऱ्या- जाणाऱ्यांवर सुरक्षा कर्मचारी नियंत्रण ठेवतील. असं असतं बॉलिवूडच्या इतर स्टार्सचे संरक्षण होते कंगनाला तिचं सुरक्षा पथक नेण्यासाठी एस्कॉर्ट वाहन मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकारी म्हणाले की झेड प्रकारातील सुरक्षा कर्मचार्‍यांना एस्कॉर्ट वाहन मिळतं आणि झेड-प्लस प्रकारात एस्कॉर्ट वाहनासह पायलटही मिळतो. बॉलिवूडमधील इतर तारे बहुतेक महाराष्ट्र पोलीस किंवा खासगी सुरक्षा एजन्सीद्वारे स्वतःच्या सुरक्षेची काळजी घेतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35h8hJ2