मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं कळल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. नुकतंच त्याचं केमोथेरपीचं पहिलं सायकल पूर्ण झालं. यानंतर सिनेमांसाठीचं प्रेम संजयला स्वस्थ बसू देत नव्हतं. म्हणून त्याने सिनेमाच्या चित्रीकरणाला जायचा पुन्हा एकदा निर्णय घेतला. ''चं दोन दिवस करणार शूट रिपोर्ट्सनुसार त्याच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी पुन्हा एकदा सेटवर गेला आहे. तो तिथे दोन दिवस चित्रीकरण करेल आणि त्यानंतर पुन्हा उपचार सुरू करेल. संजय दत्तला सोमवारी मुंबईतील एका स्टुडिओच्या बाहेर पाहण्यात आलं. संजय दत्तचं पहिलं केमोथेरपी सायकल पूर्ण नुकतंच संजय दत्तचं केमोथेरपीचं पहिलं सायकल पूर्ण झालं. तर दुसरं सायकल पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. असं म्हटलं जातं की संजयने पहिल्या केमोथेरपीला उत्तम प्रतिसाद दिला. दुसऱ्या केमोवेळीही चांगल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. असं असलं तरी संजयला एकूण किती केमोथेरपी घ्यावी लागतील याबद्दल अजून काही कळू शकलं नाही. उपचारांसाठी परदेशात जाण्याचा विचार करत होता संजय दत्त संजय दत्त फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी अमेरिकेत जाण्याचा विचार करत होता. असं म्हटलं जात होतं की त्याने यासाठी अमेरिकेचा सहा वर्षांचा व्हिसाही मिळवला होता. पण नंतर त्याने आपला निर्णय बदलून संपूर्ण उपचार मुंबईतच करण्याचा निर्णय घेतला. करोना काळात संजय अमेरिकेत उपचारांसाठी जाईल की नाही यावर अजूनही संभ्रम आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2FfXcNH