Full Width(True/False)

Poco M2 भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोनला आज अखेर भारतात लाँच करण्यात आले आहे. शाओमीचा सब ब्रँड पोको इंडियाने आज एका ऑनलाइन कार्यक्रमात आपला लेटेस्ट हँडसेट लाँच केले. नवीन पोको फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिस्प्ले आणि ६ जीबी रॅम यासारखे खास वैशिष्ट्ये आहेत. पोकोचा हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर मिळेल. वाचाः Poco M2 ची किंमत पोकोच्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या फोनची किंमत १० हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर १५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून सुरू होणार आहे. आयसीआयसीआय बँक आणि फेडरल बँक कार्डद्वारे पोको एम २ खरेदी केल्यास ७५० रुपयांचा तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. पोकोचा हा फोन ब्रिक रेड, स्लेट ब्लू आणि पिच ब्लॅक कलर मध्ये येतो. कंपनी फोनसोबत स्क्रीन प्रोटेक्टर फ्री देत आहे. वाचाः वाचाः Poco M2 चे वैशिष्ट्ये पोको एम२ मध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस देण्यात आला आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरीला ग्लास ३ दिला आहे. फोनमध्ये २.० गीगाहर्ट्ज मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर दिला आहे. ग्राफिक्ससाठी ARM माली-G52 जीपीयू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोन गेमिंग एक्सपिरियन्स जबरदस्त असणार आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम देण्यात आली आहे. पोको एम २ मध्ये ६४ जीबी व १२८ जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. वाचाः फोन अँड्रॉयड 10 बेस्ड MIUI वर काम करतो. या फोनला लवकरच MIUI 12 अपडेट मिळणार आहे, असे कंपनीने या कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये बॅटरी २ दिवसांपर्यंत चालणार, असा कंपनीचा दावा आहे. बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेरा एवन डिटेक्शनसोबत येते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3i9zzoD