Full Width(True/False)

Nokia 2.4 चे वैशिष्ट्ये लाँच आधीच लीक, पाहा काय खास आहे

नवी दिल्लीः HMD Global या आठवड्याच्या अखेरमध्ये बर्लिनमध्ये होणाऱ्या IFA 2020 इवेंट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन २.४, नोकिया ३.४, नोकिया ६.३ आणि नोकिया ७.३ ला लाँच करणार आहे. फोनच्या लाँचिंगला आता काही दिवस बाकी आहेत. परंतु, या दरम्यान टिप्स्टर Evan Blass ने नोकिया 2.4 च्या प्रेस रेंडरला लीक केले आहे. लीक प्रेस रेंडरच्या माहितीनुसार, वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले सोबत येणार आहे. वाचाः रेंडर पाहून अंदाज बांधला जावू शकतो की, फोनच्या लेफ्ट साइडमध्ये गुगल असिस्टेंटला अॅक्सेस करण्यासाठी डेडिकेटेड बटन दिले आहे. फोनच्या राईट साइडला व्हॅल्यूम रॉकर आमि पॉवर बटन मिळू शकते. नोकिया २.४ मध्ये ग्रेडियंट कलर प्लास्टिक दिले आहे. फोनचा कॅमेरा सेटअप बॅक पॅनेल मध्ये वरच्या बाजुला सेंटर दिले आहे. एलईडी आणि ड्यूल लेन्सचा कॅमेरा हा कॅमेरा सेटअप व्हर्टिकल डिझाइन आणि त्याच्या खाली फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. वाचाः नोकिया २.४ मध्ये मिळू शकते हे वैशिष्ट्ये नोकिया २.४ स्मार्टफोनचे कोडनाव 'Wolverine' आहे. याचे मॉडल नंमबर व्हेरियंट्स TA-1270, TA-1274, TA-1275 आणि TA-1777 आहे. फोनमध्ये एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला जावू शकतो. अँड्रॉयड १० ओएसवर काम करणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी २२ ओएस मिळण्याची शक्यता आहे. वाचाः वाचाः कंपनीने या फोनला दोन व्हेरियंट म्हणजेच २ जीबी प्लस ३२ जीबी आणि ३ जीबी प्लस ६४ जीबी मध्ये लाँच करू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी दिली आहे. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार हा फोन ग्रे, ब्लू आणि पर्पल कलर ऑप्शनमध्ये लाँच होऊ शकतो. फोनची किंमत किती असणार आहे. या संबंधीमाहिती अद्याप समोर आली नाही. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bvO7wl