नवी दिल्लीः ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या ओप्पोचा हा फोन दोन रॅम आणि स्टोरेजमध्ये येतो. तसेच तीन कलर ऑप्शनमध्ये येतो. ५जी नेवटवर्क सपोर्ट सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, फास्ट चार्जिंग यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. वाचाः किंमत किती चीनमध्ये ओप्पो रेनो ४ एसई च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २४९९ चीनी युआन म्हणजेच २७ हजार १०० रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २७९९ चिनी युआन म्हणजे ३० हजार ४०० रुपये आहे. हा फोन सुपर फ्लॅश ब्लॅक, सुपर ब्लू आणि सुपर फ्लॅश व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येतो. चीनमध्ये फोनची प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर रोजी या फोनचा पहिला सेल आहे. वाचाः Oppo Reno 4 SE स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये ओप्पोच्या या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड ColorOS 7.2 वर काम करतो. ८ जीबी रॅम च्या या फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक Dimensity 720 SoC प्रोसेसर मिळणार आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सल मायक्रो लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः यूएसबी टाइप सी पोर्टसोबत येणाऱ्या या फोनमध्ये फोनला पॉवर देण्यासाठी 4300mAh बॅटरी दिली आहे. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी सर्व स्टँडर्ड ऑप्शन दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2EkEbcP