Full Width(True/False)

Redmi 9 स्मार्टफोन खरेदीची संधी, दुपारी १२ वाजता सेल

नवी दिल्लीः रेडमीचा जबरदस्त बजेट स्मार्टफोन आज सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. सेलची सुरुवात दुपारी १२ वाजता आणि वर सुरू होणार आहे. कार्बन ब्लॅक, स्काय ब्लू आणि स्पोर्टी ऑरेंज कलर या ऑप्शनमध्ये येणारा हा फोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटनरल स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किममत ९९९९ रुपये आहे. वाचाः रेडमी ९ चे वैशिष्ट्ये फोन मध्ये 720x1600 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.५३ इंचाचा एचडी डॉट ड्रॉप डिस्प्ले दिला आहे. ४ जीबी रॅम सोबत येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G35 SoC प्रोसेसर मिळतो. ६४ जीबी आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकतो. वाचाः फोटोग्राफीसाटी फोनमध्ये ड्यूल रियर कॅमेरा सेटअपड दिला आहे. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात १० वॉट फास्ट चार्जिंगसोबत 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो यूएसबी पोर्ट आमि 3.5mm हेडफोन जॅक यासारखे फीचर दिले आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्ट करणाऱ्या फोनमध्ये MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RGCSYK