Full Width(True/False)

Jio vs Airtel vs Vi: फ्री कॉलिंग सोबत 740GB पर्यंत डेटा

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपन्या लवकरच आपले प्रीपेड प्लानचे टॅरिफ महाग करू शकते. नुकसान भरून काढण्यासाठी कंपन्या प्लान्सची किंमत महाग करण्याची शक्यत आहे. प्लान महाग होण्याआधी तुम्ही लाँग टर्म वैधता असलेले प्लान रिचार्ज करू शकता. रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि एअरटेलचे सर्वात जास्त बेनिफिट देणारे लाँग टर्म रिचार्ज प्लान्स मध्ये सोबत बेनिफिट दिले जात आहे. वाचाः एअरटेल युजर्ससाठी बेस्ट प्लान एअरटेलचा नंबर यूज करीत असाल तर तुम्ही २६९८ रुपयांचा प्रीपेड प्लानने रिचार्ज करू शकते. प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केले जात आहे. ३६५ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. प्लानमध्ये तुम्हाला १०० फ्री एसएमएस चा फायदा मिळते. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्समध्ये ३९९ रुपयांच्या किंमतीचा डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. तसचे प्लानमध्ये कंपनी एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः रिलायन्स जिओचा हा प्लान बेस्ट लाँग टर्म बेनिफिटसाठी रिलायन्स जिओचा २५९९ रुपयांचा प्लान चांगला आहे. यात रोज २ जीबी डेटासोबत १० जीबी बोनस डेटा दिला जातो. ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये जिओ नेटवर्क्ससाठी अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. तर, अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी या प्लानमध्ये १२ हजार मिनिट्स मिळतात. रोज १०० एसएमएस सोबत डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन सोबत जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते. वाचाः Vi युजर्ससाठी बेस्ट प्लान मोठी वैधतेसाठी वोडाफोन युजरसाठी २५९५ रुपयांचा प्लान रिचार्ज करू शकता. ३६५ दिवसांच्या वैधतेसोबत येणाऱ्या या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ऑफर केले जाते. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केले जाते. रोज १०० फ्री एसएमएस सोबत या प्लानमध्ये ९९९ रुपये किंमतीचा झी ५ चे सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. या बातम्या वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RMl2ng