Full Width(True/False)

१० हजारांपेक्षा कमी किंमतीत 'हे' दमदार स्मार्टफोन्स

नवी दिल्लीः १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत असलेल्या फोनची सर्वात जास्त मागणी आहे. स्मार्टफोन कंपन्या या दिवसांत सेगमेंटमध्ये लागोपाठ नवीन हँडसेट आणत आहे. बजेटच्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. त्यामुळे कोणता फोन घ्यायचा याची निवड करणे अवघड आहे. जर तुम्हाला १० हजारांपेक्षा कमी किंमतीत फोन खरेदी करायचा असेल तर यावर एक नजर टाका. Narzo 20A रियलमी नार्जो २० ए स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहे. सर्वात बेस्ट एन्ट्री लेवल स्मार्टफोन पैकी एक आहे. स्वस्त किंमतीत ६.५ इंचाचा डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी दिली आहे. हँडसेट रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट करतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६५ चिपसेट दिला आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम दिला आहे. वाचाः Realme C11 रियलमी सी ११ एक जबरदस्त फोन आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले, ऑक्टा कोर हीलियो G35 प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम सारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. 9i शाओमीचा रेडमी ब्रँड नेहमी बजेटमधील क्वॉलिटी स्मार्टफोन्स आणत असतो. रेडमीच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, 5000mAh बॅटरी दिली आहे. तसेच १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सलचे दोन रियर सेन्सर दिले आहे. वाचाः realme c15 रियलमी सी १५ स्मार्टफोन १० हजारांपेक्षा कमी किंमतीत एक चांगला पर्याय आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी पूर्ण एक दिवस चालू शकते. या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. C3 पोको सी ३ मध्ये ६.५३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो G35 प्रोसेसर आहे. रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः Smart 4 Plus ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज सोबत या फोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे. ६.८२ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आणि 6000mAh बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30ENqMJ